Solapur : आळंदीत शनिवारी कार्तिकी एकादशी; लाखो भाविक अलंकापुरीत दाखल
संजीवन समाधी दिन सोहळा कार्तिकी एकादशी हरीनाम गजरात साजरा
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत शनिवारी श्रीचे ७३० व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी हरीनाम गजरात साजरी होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. प्रारंभी श्री गुरु हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा परंपरेने जयघोषात झाली. भाविकांच्या अखंड हरिनामाने अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
सोहळ्यात श्रीना पवमान अभिषेक, दुधारती, महानैवेद्य, धुपारती झाली. चारच्या सुमारास श्री गुरु हैबतराव बाबा यांचे दिंडीने मंदिर आणि नगर प्रदक्षिणा हरीनाम गजरात पूर्ण केली. शनिवारी सोहळ्यात कार्तिकी एकादशी साजरी होत आहे. पहाटे पवमान अभिषेख, दुधारती, ११ ब्रम्हनुन्दाचे वेदमंत्र जयघोष, श्रीना महानैवेद्य, श्रीचे पालखीची नगर प्रदक्षिणा, धुपारती, परंपरेने संतोष महाराज मोझे यांचे वतीने हरिजागर सेवा रुजू होणार आहे.
गुरुवारी बाबासाहेब देहूकर, वास्कर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा झाली. पहाटे पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांचे चल पादुकांवर पूजा हरिनाम गजरात झाल्या.