महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला अटक

03:03 PM Jan 14, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

शादी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून महिला, तरुणीना ओळख निर्माण करुन, त्यांच्याशी जवळीकता निर्माण करीत, त्यांच्याकडून पैसे उकळून, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या पुणे येथील पोलीस रेकॉर्डवरील लखोबा लोखंडेला पोलिसांनी जेरबंद केले. फिरोज निजाम शेख ( मुळ रा. गंगावळण, कळाशी, ता. इंदापुर, जि. पुणे, सध्या रा. प्लॅट क्र 602, बी विंग, आयडियल होम अपार्टमेंट, उस्मानिया मजीद जवळ, मिठानगर, कोंढवा, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून कोल्हापूरातील एका महिलेची फसवणूक करुन, तिच्याकडून उकळलेल्या रक्कमेपैकी 1 लाखाची रोकड जप्त केली. गुन्हेगार शेखने आतापर्यत 25 पेक्षा जास्त महिला, तरुणीची फसवणुक केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याला जुना राजवाडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सोमवारी दिली.

Advertisement

कळमकर म्हणाले, संशयित शेखने शादी डॉट कॉम या नावाची एक वेबसाईट तयार केली. ही वेबसाईट सोशल मिडीयावऊन व्हायरल केली. या वेबसाईटवर काही लग्नाळू महिला, तरुणीनी स्वत:ची सविस्तर माहितीची प्रोफाईल तयार कऊन, त्याने व्हायरल केलेल्या वेबसाईट पाठविल्या होत्या. शादी हॉट कॉम या संकेत स्थळावर आलेल्या प्रोफाईलवऊन तो संबंधीत महिला व तऊणीना रिक्वेष्ट पाठवून, त्यांचा मोबाईल नंबर घेवून, त्यांना मी उच्चशिक्षीत अविवाहित व्यावसायिक असल्याचे सांगून, महिला आणि तऊणीच्याबराबेर ओळख निर्माण कऊन, त्याच्याशी जवळीकता साधत, मी तुमच्या बरोबर लग्न करण्यास इच्छूक आहे, असे सांगून तो महिला आणि तऊणीच्यावर अत्याचार कऊन, त्यांची आर्थिक फसवणूक करीत होता.

त्याच्या या वेबसाईटवर जिह्यातील एका शहरातील घटस्फोटित महिलेने आपला एक लहान मुलगा असल्याने, त्यांच्या भवितव्य व आपल्या जीवनामध्ये जोडीदार असावा. या विचाराने लग्न करण्याचे ठरवून, प्रोफाईल तयार कऊन पाठविली होती. त्यानंतर त्याने या महिलेला रिक्वेष्ट पाठवून, तिचा मोबाईल नंबर घेतला. या महिलेला खोटी माहिती देवून, विश्वास संपादन केला. त्या महिलेच्या घरी येवून मी तुमच्याशी लग्न करण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. त्यावर त्या महिलेने लग्नास पंसती कळविली. त्यानंतर गुन्हेगार शेखने त्या महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. त्याचबरोबर आपल्याला आर्थिक अडचणी आल्याचे सांगून, पिडीत महिलेचे 11 तोळे सोन्याचे दागिणे व 1 लाख 69 हजार ऊपयांची रोकड घेतली. त्यानंतर त्याने आपल्याला ब्रेनटयुमरचा आजार झाला आहे. माझे आयुष्य कमी आहे. त्यामुळे मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे सांगून तो संपर्क तोडू लागला. त्यामुळे त्याने आपली फसवणुक केल्याची पिडीत महिलेची खात्री झाल्याने, तिने याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे जुना तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून याविषयी राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यावऊन गुन्हेगार शेखविरोधी शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला.

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तांत्रीक माहिती व गोपनीय बातमीच्या आधारे मुंबई व पुणे येथे शोध सुऊ केला. याचदरम्यान तो कोढवा (जि. पुणे) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावऊन त्या ठिकाणी छापा टाकून त्याला रविवारी अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून पिडीत महिलेकडुन घेतलेल्या रक्कमेपैकी 1 लाख रुपये जप्त केले. त्याला न्यायालयात हजर करणय्ता आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

गुन्हेगार फिरोज शेखच्या अमिषाला ज्या महिला व तऊणींनी बळी पडले आहेत. त्यांनी त्याच्या विरोधी फिर्याद देण्यासाठी जुनाराजवाडा पोलीस ठाणेशी संपर्क साधवा, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलेले आहे.

गुन्हेगार फिरोज शेखला अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार विलास किरोळकर, सचिन पाटील, अमित सर्जे, सोमराज पाटील, योगेश गोसावी, राजेंद्र वरंडेकर, सुरेश पाटील, शिवानंद मठपती सायबर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे, पोलीस अमंलदार सचिन बेंडखळे यांचा सहभाग होता.

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article