For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मे महिन्यातही होणार लाही-लाही

06:59 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
मे महिन्यातही होणार लाही लाही
Advertisement

वाढत्या उष्म्याने लोक हैराण : एप्रिल महिन्याने अनुभवले आतापर्यंतचे सर्वात उष्ण तापमान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीय राजधानीसह देशाच्या विविध भागात मे महिन्यात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त होऊन उष्णतेची लाट आणखी काही दिवस तीव्र होऊ शकते, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) बुधवारी दिला. ईशान्य भारतातील बहुतांश भाग आणि उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारत आणि उत्तर-पूर्व द्वीपकल्प भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याची माहिती ‘आयएमडी’चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.

Advertisement

ईशान्य भारतातील बहुतांश भाग आणि उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारत आणि उत्तर-पूर्व द्वीपकल्प भारताच्या काही भागात पारा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्मयता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानसह इतर भागात मे महिन्यात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याचेही ‘आयएमडी’चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

यंदा एप्रिल महिन्यातच अनेक राज्यांमध्ये उष्णता वाढू लागल्यानंतर आता मे महिन्यातही काही भागात पारा 46-47 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचण्याचा अंदाज आहे. या वाढत्या उष्म्यामुळे अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले गेले. गेल्या काही दिवसात बेंगळूर, कोलकाता आणि मुंबई या तीन मोठ्या शहरांमध्ये उष्णतेचे विक्रम मोडले गेले. एप्रिल महिन्यात संपूर्ण दक्षिण भागात सरासरी कमाल तापमान 37.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हादेखील एक विक्रमच आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे सर्वात उष्ण तापमान अनुभवले आहे.

हवामान खात्याच्या आकडेवारीवरून एप्रिल महिन्यात पूर्व आणि ईशान्य भारतातील सरासरी तापमान गेल्या 51 वर्षांतील सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलच्या शेवटच्या तारखेला मंगळवारी पहिल्यांदाच देशाच्या काही भागात पारा 47 अंशांच्या पुढे गेला. बंगालच्या कलाईकुंडा येथे 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हे तापमान सामान्यपेक्षा 10.4 अंश जास्त आहे. त्याचबरोबर झारखंडच्या पूर्व सिंघभूम जिह्यातील बहरागोरा येथे 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय कलईकुंडा, पानागढ (बंगाल) आणि बालासोर (ओडिशा) येथेही उच्चांकी तापमान नोंद झाले आहे.

मध्य भारतातील ओडिशाचा बहुतांश भाग सलग 16 दिवस उष्णतेच्या लाटेत आहे. राज्यात सर्वात जास्त काळ उष्णतेची लाट 26 दिवस राहण्याचा विक्रम 1998 मध्ये नोंदवला गेला होता. एप्रिलमध्ये हवामानातील बदलांमुळे पूर्व भारतात तीव्र उष्णता जाणवत आहे. बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये दरवर्षीपेक्षा उष्णता वाढली आहे. कोलकात्यातील अलिपूर येथेही 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. हे तापमान जवळपास शतकापूर्वी नोंदवलेल्या 43.9 च्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा कमी असले तरी एप्रिल महिन्यात तापमान 43 अंशांवर पोहोचण्याची ही दुसरी वेळ होती.

झारखंडमध्ये प्रचंड उष्णतेचे सावट असून पूर्व सिंगभूम जिह्यातील बहरागोरा येथे मंगळवारी कमाल तापमान 47.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने बुधवारी राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. बुधवारी कमाल तापमान सामान्यपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअस जास्त नोंद झाल्याचे हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. साहिबगंज, गो•ा, पाकूर, दुमका, जामतारा, देवघर, धनबाद, बोकारो, सरायकेला-खरसावन, पूर्व आणि पश्चिम सिंगभूममध्ये तीव्र उष्णता होती.

Advertisement
Tags :

.