Ladaki Bahin Yojana संशयाच्या भोवऱ्यात का सापडलीये?, काय आहेत कारण..
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासूनच वादात सापडलेली आहे
कोल्हापूर : लाडकी बहीण योजना सध्या बोगस लाभार्थ्यांवरून पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महिलांसाठी असणाऱ्या या योजनेत तब्बल १४ हजार पुरुषांच्या नावावर रक्कम जमा झाल्यावरून तसेच शासकीय निवृत्त महिला कर्मचारी आणि ६५ वर्षावरील महिलांच्या खात्यावरही पैसे जमा झाल्यावरून विरोधक राज्य शासनाला कोंडीत पकडत आहेत,
लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांसंदर्भात कोल्हापुरातील संबंधित विभागात चौकशी केली असता त्यांच्याकडून कोणतीची माहिती दिली जात नाही. कोल्हापुरातील बोगस लाभार्थ्यांबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणतेच आदेश आले नसल्याचेडी सांगण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासूनच वादात सापडलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या योजनेला सुरवात झाली. राज्य शासनाचे ४२ हजार कोटी रूपये या योजनेवर खर्च होतात. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू केल्याचा आरोप विरोधकांनी केला महायुती पुन्हा सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा
भार सरकारच्या तिजोरीवर पडल्याची कबुलीडी सत्तेतील नेत्यांनी दिली आहे. या योजनेमुळे ठेकेदारांची हजारो कोटींची बिलेडी थकल्याचे आरोप झाले. हे कमी असतानाच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजार २९८ पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १० महिन्यांपर्यंत या पुरुषांना २१.४४ कोटीचे वाटपही करण्यात आले आहे.
एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभदिला जाणार नाही, असा नियम असताना एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची ७ लाख ९७ हजार ७५१ प्रकरणे समोर आली आहेत. अशा प्रकरणांतील महिलांना लाभार्थीच्या यादीतून वगळण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेत ४ हजार ८०० कोटींचा घोटळ्याचा आरोप केला आहे. यावर सरकारकडून चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच काही महिलांची खाती नसल्याने त्यांच्या पतीच्या खात्यावर पैसे जमा केले असल्याची शक्यताही सरकारने व्यक्त केली आहे. या
चबरोबर शासकीय सेवेत असणाऱ्या सेवानिवृत्त महिला, ६५ वर्षावरील महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याची चर्चा रंगली आहे. यामधील बोगस लाभाध्यांचे १५०० रूपयांचे मानधन थांबविण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाई करा, जसे आदेश दिले आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले असून बोगस लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. बोगस लाभार्थ्यांकडून मानधन वसूल केले जाणार
कोल्हापुरात सावळा गोंधळ
राज्यात १४ हजार पुरुषांच्या नावे लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कोल्हापुरात नेमके किती पुरुष बोगरा लाभार्थी आहेत. याबाबत संबंधित विभागात चौकशी केली असता त्यांनी यासंदर्भात आपल्याकडे कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले.
मुंबईमध्ये योजनेचा मुख्य सर्व्हर आहे. कोल्हापुरात लाभार्थ्यांबाबत सविस्तर माहिती मिळू शकत नाही किंवा येथे तसे पाहण्याची सुविधा नाही. तसेच कोल्हापुरात बोगस लाभाव्यर्थ्यांची तपासणी करण्याबाबत कोणतेही आदेश वरिष्ठ पातळीवरून प्राप्त नसल्याचेही सांगण्यात आले.
वास्तविक शासनाने जिल्हा पातळीवर लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध करणे गरजेचे होते. जिल्ळ्यात अपात्र लाभार्थी किती झाले सध्या किती लाभार्थी आहेत, याचीही माहिती मिळू शकत नाही. यामुळे योजनेमध्ये सावळा गोंधळ असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
१७६ महिलांनी स्वतःहून केली योजना बंद
निवडणुकीपूर्वी सरसकट सर्वच महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये पात्र नसलेल्या महिलांचाही समावेश होता. प्रशासनाच्या आवाहनानुसार कोल्हापूर जिल्हयातील १७६ महिलांनी स्वतःहून योजना बंद केली आहे. यामध्ये काही महिला इतर योजनेचा लाभ घेत असल्याने ही योजना बंद केल्याचे समजते.
६५ वर्षांवरील बोगस लाभार्थी असणे अशक्य
६५ वर्षावरील लाभार्थ्यांची नोंदच संगणकमध्ये होत नाही. त्यामुळे ६५ वर्षावरील महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची शक्यता नाही, असा दावा कोल्हापुरातील संबंधित विभागातील अधिकारी करत आहेत.