कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फूट ओव्हरब्रिजच्या अभावाने प्रवाशांची मोठी गैरसोय

10:57 AM May 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मागील चार महिन्यांपासून रेल्वे स्थानकावरील काम संथगतीने सुरू : अपघात होण्याची दाट शक्यता

Advertisement

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकातील फूट ओव्हरब्रिजचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे प्लॅटफॉर्म क्र. 2 अथवा 3 वर रेल्वे आल्यास नागरिकांची धावपळ उडत आहे. वेळेत रेल्वेत प्रवेश मिळविण्यासाठी काही जण ट्रॅकवर उतरून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा धोकादायक प्रयत्न करीत आहेत. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्मार्ट रेल्वेस्थानकात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वयोवृद्ध तसेच लहान मुलांसाठी एका ठिकाणी एक्सिलेटर (सरकता जिना) बसविण्यात आला आहे. परंतु प्लॅटफॉर्म  1 पासून चारपर्यंत अखंड जोडणारा फूट ओव्हरब्रिज नव्हता. जुना फूटओव्हर ब्रिज चार महिन्यांपूर्वी पाडण्यात आला. त्यानंतर त्याठिकाणी नवा फूट ओव्हरब्रिज करण्याचे काम सुरू झाले.

Advertisement

प्रवाशांची दमछाक

मागील अनेक दिवस उलटले तरी फूट ओव्हरब्रिजच्या कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे संथगतीने ब्रिजचे काम सुरू आहे. परंतु यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. विशेषत: बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेस सकाळी प्लॅटफॉर्म क्र. 3 वर आणली जाते. यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराकडे येण्यासाठी पूर्ण रेल्वे स्थानकाला वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. सध्या असलेला फूट ओव्हरब्रिज हा रेल्वे स्थानकाच्या एका टोकाला असल्याने प्रवाशांची दमछाक होत आहे. रेल्वे स्थानकाला वळसा घालावा लागत असल्याने काही नागरिक थेट रेल्वे ट्रॅकवर उड्या मारून प्लॅटफॉर्म क्र. 1 वर चढत आहेत. सध्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू असल्याने ही एक्स्प्रेस गतीने स्थानकात दाखल होते. त्यामुळे धोका वाढला आहे. रेल्वे पोलिसांकडून ट्रॅकवर उतरण्यास मनाई करून देखील सर्रास नागरिक शॉर्टकट वापरत आहेत. परंतु यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा

रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे फूट ओव्हरब्रिजचे संथगतीने काम सुरू आहे. प्रवाशांनी अनेकवेळा तक्रारी करून देखील रेल्वेकडून दखल घेतली जात आहे. वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांना रेल्वेमध्ये चढणे व उतरणे गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे फूट ओव्हरब्रिजचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article