कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुरुब समाजाचे 15 रोजी आंदोलन

12:59 PM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कुरुब समाजाला एसटी आरक्षण देण्याकडे राज्य सरकार कानाडोळा करत आहे. त्यामुळे आरक्षणाविना समाजबांधवांना समस्या निर्माण होत आहे. आरक्षणासाठी अनेकवेळा आंदोलन करून निवेदने दिली. तरी, राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे बेळगाव येथील आगामी सुवर्णसौधमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी राज्य कुरुब संघातर्फे केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आरक्षविना समाज बांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी अनेकवेळा राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले होते. याचीही दखल घेण्यात आली नाही. मात्र आता सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिवेशनावेळी भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील सुमारे 50 हजार समाज बांधव सहभागी होणार आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article