‘रिस्की रोमियो’मध्ये कृती खरबंदा
अभिनेता सनी सिंहचा आगामी चित्रपट ‘रिस्की रोमियो’चे चित्रिकरण कोलकात्यात पूर्ण झाल्याची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा अबीर सेनगुप्ता यांनी लिहिली असून त्यांनीच याचे दिग्दर्शन पेले आहे. सेनगुप्ता यांनी यापूर्वी ‘इंदू की जवानी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर मिसेस अंडरकव्हर या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. रिस्की रोमियो या चित्रपटात कृती खरबंदा हा नायिकेची भूमिका साकारत आहे. चित्रिकरण पूर्ण झाल्यावर अत्यंत समाधानी वाटत आहे. या चित्रपटातील माझी भूमिका वेगळी आहे. सर्वसाधारपणे अशाप्रकारच्या भूमिका मिळत नाहीत. चित्रपटात अत्यंत वेगळया प्रकारे भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली असल्याचे सनी सिंहने म्हटले आहे. रिस्की रोमियोच्या सेटवर पूर्णपणे वेगळे वातावरण होते. प्रेक्षकांसमोर याची कहाणी सादर करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. सनी आणि कृतीने यात केलेला अभिनय सर्वांनाच पसंत पडणार असल्याचे लेखक-दिग्दर्शक अबीर सेनगुप्ता यांनी म्हटले आहे.