कुर्डुवाडी येथे रेल्वेरुळावर दगड ठेऊन लुटमार व घातपात घडविण्याचा प्रयत्न
लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
कुर्डुवाडी वार्ताहर
कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून साधारण अर्धा ते एक कि.मी अंतरावर सिग्नल पाॅइंट जवळ रेल्वे रूळावर मोठा दगड व सिग्नलच्या कप्लिंगमध्ये दगडे ठेऊन घातपात घडविण्याचा प्रयत्न लोकोपायलट रियाज शेख यांच्या सतर्कतेमुळे टळला. ही घटना बुधवार दि.४ रोजी रा. ८.२५ वा. सुमारास कुर्डुवाडी स्थानकापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर सोलापुरच्या दिशेला घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की इलेक्ट्रिक रेल्वे च्या ओव्हरहेड वायरीची देखभाल करण्यासाठी असणारी टाॅवर वॅगन ही मलिकपेठ हून कुर्डुवाडीकडे येत असताना कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर सिग्नल पाॅइंटजवळ मोठा दगड जो रुळाच्या बाजूला रेल्वे लोकोपायलट व गार्ड यांच्यासाठी सुचित करणारा फाॅलोइंग मार्क चा दगड असतो तो दगडच कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी उचलून लूटमार, घातपाताच्या उद्देशाने रेल्वे रूळावर ठेवला व सिग्नल पाॅइंट मध्ये ही दगडे ठेवली होती. नेमके यावेळी त्यामार्गावरुन कोणती पॅसेंजर ट्रेन येण्यापूर्वी इलेक्ट्रिक रेल्वेच्या ओव्हरहेड वायरची देखभाल करणारी टाॅवर वॅगन ट्रेन मलिकपेठहून कुर्डुवाडीकडे रा.८.१५ वा सुमारास आली. त्यावेळी टाॅवर वॅगनचे लोकोपायलट रियाज शेख, जे ई उमेश ब्रदर यांना रेल्वे रूळावर काही तरी ठेवल्याचे दिसले.त्यांनी सतर्कता बाळगत सुमारे दोनशे मीटर अंतरावर गाडी थांबवून याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली. तोच रेल्वे चे अधिकारी पोलिस, रेल्वे सुरक्षाबलाचे जवान घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले. संबंधित कर्मचाऱ्यांनी दगड हटवून रेल्वेला मार्ग मोकळा करुन दिला. ल