कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli News : कुपवाड श्री यल्लमा देवी यात्रेला 4 डिसेंबरपासून उत्साहात प्रारंभ!

05:45 PM Dec 02, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                                     कुपवाडमध्ये यल्लमा देवी यात्रेची धामधूम

Advertisement

कुपवाड : कुपवाड शहरवासियांचे ग्रामदैवत तसेच जागृत देवस्थान आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला गुरूवारी ४ डिसेंबरपासून उत्साहात प्रारंभ होणार आहे. रविवारी महानैवेद्य असल्याने सात डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिली. गुरूवार ४ ते बुधवार १० डिसेंबर अखेर यात्रा होणार आहे.

Advertisement

रमेश पाटील म्हणाले, यात्रेनिमित्त सर्व विधी भक्तिमय वातावरणात पार पडणार आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी गुरुवारी ४ डिसेंबर रोजी देवीस तेल चढविणे, शुक्रवार ५ रोजी गंधोटी, शनिवार ६ रोजी भाजी भाकरी नैवेद्य व रात्री धनगरी ओव्या होतील. रविवार ७ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने यादिवशी
महानैवेद्य व बोनी. रात्री टीव्हीस्टार बळीराम पुजारी, परसूमामा पाटील व सर्जेराव पाटील यांचा जोगत्याचा कार्यक्रम होणार आहे.

तर सोमवार ८ रोजी यल्लमा देवीच्या पालखीची मिरवणूक व भव्य आतषबाजी. संध्याकाळी ५ वाजता किच, असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या किचाचे मानकरी रोहीदास समाज कुपवाड व राजू सदाशिव जाधव (पुजारी) आहेत. बुधवारी १० डिसेंबर रोजी सकाळी ११ महाप्रसाद आहे.

Advertisement
Tags :
#CulturalEvents#Devotion#KupwadYatra#MaharashtraCulture#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#Yatra2024ReligiousFestivalTempleFestivalYellammaDevi
Next Article