Sangli Crime : कुपवाड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन सराईत गुन्हेगार जेरबंद
कुपवाड पोलिसांची ‘डॅशिंग अॅक्शन
कुपवाड : कुपवाड शहरातील सतत वर्दळीच्या ठिकाणी असण्ाया मुख्य सोसायटी चौकात छोट्या मोठ्या व्यावसायिकांना तसेच नागरिकांना विनाकारण धमकावून नाहक त्रास देत दहशत माजविणाऱ्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील तिघा सराईत गुन्हेगारांना पकडून कुपवाड पोलिसांनी चांगलेच फोडकाम केले.
दरम्यान, कुपवाड शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी उचललेले कडक कारवाईचे पाऊल नक्कीच कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी कुपवाडकरांनी व्यक्त केली.
बुधवारी सायंकाळी भरचौकात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांत धांदल उडाली. पोलिसांनी बराचवेळ गुन्हेगारांना लाठीचा प्रसाद दिला. यावेळी पोलिसांची डॅशिंग कारवाई पाहण्यासाठी बघ्यांनी रस्त्याकडेला प्रचंड गर्दी केली होती. काहीवेळात वाहतूकही ठप्प होऊ लागली. गर्दी हटवण्यासाठी पुन्हा पोलिसांची दमछाक झाली.
कुपवाड शहरातील वाढती गुन्हेगारी नागरिकांना डोकेदुखी ठरली आहे. याबाबत नागरिकात भीती निर्माण झाल्याने कुपवाड पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात अॅक्शन प्लॅन करून घडक कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक तयार करून कारवाईसाठी शहरातील डार्क स्पॉट वर नजर ठेवली आहे.
बुधवारी सायंकाळी सहाय्यक निरीक्षक घाडगे पथकासह शहरात गस्तीवर होते. यावेळी मुख्य मार्गावरील रहदारीच्या सोसायटी चौकात रेकॉर्डवरील सराईत तिघेजण नागरिकांत धमकी देत दहशत निर्माण करत होते. त्यांच्या दहशतीला घबरून त्रस्त नागरिक पोलिसात तक्रार द्यायला तयार नव्हते.
हा प्रकार निदर्शनास आल्याने निरीक्षक घाडगे यांनी घटनास्थळी घाव येऊन गर्दीसमोरच गुन्हेगारांना पकडून चांगलाच चोप दिला. त्यांना समजेल अशा भाषेत पोलिसी खाक्या दाखविल्याने पोलिसांचे नागरिकांनी कौतुक केले. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कारवाईनंतर चौकात शांततेचे वातावरण होते.