Miraj News : कुपवाड महापालिकेची सिंगल यूज प्लास्टिक विरोधात कठोर कारवाई
कुपवाड शहरात एकल वापर प्लास्टिक वापर पूर्णतः बंद करण्याचे निर्देश
कुपवाड : महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या स्पष्ठ निर्देशांनुसार सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने शनिवारी कुपवाड महापालिका क्षेत्रीय कार्यक्षेत्रात सिंगल यूज (एकल वापर) प्लास्टिक विरोधात कारवाईची अंमलबजावणी मोहीम राबविली.
उपायुक्त सी. स्मृती यांच्या नियंत्रणाखाली राबविलेल्या या कारवाईत पथकाने नियमांचे उल्लंघन करणाया ६ व्यावसायिक आस्थापनांवर एकूण ३० हजाराचा दंड आकारला. 'स्वच्छ सर्वेक्षण' आणि 'माझी वसुंधरा उपक्रमांना पाटील मोठी चालना देत ही मोहीम केवळ दंडात्मक नसून पर्यावरणसंवर्धन व नागरिक जागरूकता वाढविण्यावरही समान भर देणारी होती.
कुपवाड शहरासह महापालिका क्षेत्रात एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणे. पर्यावरण प्रदूषण, कचरा वाढ व नालाबंदी टाळणे, नागरिक व व्यावसायिकांना पर्यावरणपूरक पर्याय वापरण्यास प्रोत्साहन देणे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा' व केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांना बळव टी देणे. "प्लास्टिक बंदीचे उल्लंघन कराया कोणत्याही व्यावसायिकाला दंडापासून सुट नाही.