कुपवाड एमआयडीसीत उद्योजकाला 11 लाखांचा गंडा! ‘भविष्य निर्वाह निधी’ रक्कमेच्या बनावट पावत्या जोडल्या
: एचआर मॅनेजरवर गुन्हा
कुपवाड प्रतिनिधी
कंपनीतील कामगारांची भविष्य निर्वाह निधी’ची रक्कम भरल्याच्या बनावट पावत्या जोडून कुपवाड एमआयडीसीतील एका उद्योजकाची एचआर मॅनेजरने तब्बल 11 लाख 27 हजार 388 ऊपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुपवाड पा†लसात याबाबत नोंद झाली आहे.
यामध्ये प्रोकेअर क्रॉप सायन्स या कंपनीतील मॅनेजरकडून हा प्रकार घडला आहे. त्याने कामगारांची सप्टेंबर 2020 ते 5 फेब्रुवारी 2024 अखेर भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरल्याच्या बनावट पावत्या देऊन उद्योजकाची फसवणूक केल्याचे उजेड़ात आले. याप्रकरणी उद्योजक सदाशिव पिरगोंडा लांडगे (रा. तुळजाईनगर, कुपवाड फाटा, सांगली) यांच्या फ़िर्यादीनुसार संशयित संतोष महादेव महामने (वय 35, रा. बाळूमामा मां†दराजवळ, वॉन्लेसवाडी, सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी सदाशिव लांडगे यांची कुपवाड एमआयडीसीत प्रोकेअर क्रॉप सायन्स नावाची कंपनी आहे. या कंपनीतील कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याचे काम कॉर्पकल एच. आर. सोल्युशन प्रा. लि. चे एच.आर मॅनेजर संतोष महादेव महामने हे करीत होते. संशियित महामने यांनी जानेवारी 2021, फेब्रुवारी 2021, मार्च 2022, जानेवारी 2023, मार्च 2023 या महिन्यातील रक्कम 40,533, 41,897, 16,646, 56,001, 82,155 अशी एकूण 2 लाख 37 हजार 232 ऊपये शासनाच्या भविष्य निर्वाह निधी पेमेंट वेबसाईटवर तसेच कामगारांच्या राज्य कामगार विमा ( ईएसआयसी) ची रक्कम 1 लाख 48 हजार 817 ऊपये अशी एकूण 3 लाख 86 हजार 140 ऊपयांची रक्कम शासनाकडे भरली असल्याच्या बनावट पावत्या संशा†यत महामने यांनी फिर्यादी सदाशिव लांडगे यांना देऊन सप्टेंबर 2020 ते मार्च 2023 या कालावधीत एकूण 11 लाख 27 हजार 388 ऊपयांची फसवणूक केली आहे. याबाबतची तक्रार कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी संशयित संतोष महामने विरोधात गुन्हा दाखल केला आहे.