महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुप्पटगिरी मराठी प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान

06:07 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ खानापूर

Advertisement

तालुक्यातील यावर्षीचा आदर्श शाळा पुरस्कार मराठी प्राथमिक शाळा कुप्पटगिरी यांना मिळाला. यावर्षी झालेल्या आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम शुभम गार्डन कार्यालय खानापूर येथे पार पडला. यावर्षीचा आदर्श शाळा पुरस्कार कुप्पटगिरी प्राथमिक मराठी शाळेला बहाल करण्यात आला. आमदार  विठ्ठल हलगेकर व शिक्षणाधिकारी राजश्री कुडची तसेच सी. आर. पी ज्योती कदम यांच्या हस्ते एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष विश्वनाथ बुवाजी व सहकारी तसेच मुख्याध्यापिका वंदना पाटील व शिक्षक वर्ग यांना आदर्श शाळा पुरस्कार वितरित करण्यात आला.

Advertisement

कुठलीही सेवा करत असताना प्रामाणिक व नि:स्वार्थीपणाने काम केल्यास यश हे निश्चित असते. कुप्पटगिरी शाळेच्या इतिहासात आदर्श शाळा म्हणून नोंद करण्यात आली. तालुका शिक्षणाधिकारी, सी.आर.पी. अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन शाळेची संपूर्ण तपासणी केली. सरकारच्या नियमानुसार शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडाक्षेत्रातील पात्रता, प्रतिभा करंजी स्पर्धेमधील यश, एसडीएमसीचे योगदान व ग्राम पंचायतीच्या सहकार्यातून व सज्ञान पालकांच्या सहकार्यातून शाळेचा झालेला विकास एकंदरीत या संपूर्ण कामकाजाची दखल घेऊन शैक्षणिक स्तरावर कुप्पटगिरी प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली.  यावर्षीचा मानाचा आदर्श शाळा पुरस्कार या शाळेला बहाल करण्यात आला. यानिमित्ताने ग्रामस्थांच्यावतीने शाळा सुधारणा कमिटी आणि शिक्षक वर्गाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article