For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुणकेरी भावई देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

04:01 PM Dec 05, 2023 IST | अनुजा कुडतरकर
कुणकेरी भावई देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव
Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

Advertisement

कुणकेरी गावचे ग्रामदैवत श्री भावई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी ६ डिसेंबर रोजी होणार आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी भावई देवीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.

यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. या दिवशी देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. यानिमित्त रात्री १० वाजता सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावपंच, स्थानिक देवस्थान कमिटी आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.