आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांना कुमारस्वामींचे आश्वासन
11:04 AM Dec 03, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : विविध मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी मंड्या येथे आंदोलन छेडलेल्या अंगणवाडी सेविकांशी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नवी दिल्लीतून फोनवर संवाद साधला. तसेच त्यांना चर्चेसाठी नवी दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. जिल्हाधिकारी कुमार यांच्यामार्फत राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी श्रीकुमारी यांच्याशी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, तुम्ही थंडीत आंदोलनाला बसू नये. तुमच्या संघटनेच्या दहा प्रमुख प्रतिनिधींनी नवी दिल्लीला यावे. मी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावेन. मी देखील बैठकीलाही उपस्थित राहीन. आंदोलन थांबवा आणि दिल्लीला या, अशी विनंती त्यांनी केली. तुमचा विमान प्रवासाचा खर्च आणि दिल्लीतील राहण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article