महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुमार विश्वास यांच्या सुरक्षेतील कमांडो बदलण्याचा निर्णय

06:31 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रोड रेजच्या घटनेनंतर उचलले पाऊल

Advertisement

वृत्तसंस्था/ गाजियाबाद

Advertisement

पूर्वीच्या कमांडोंच्या जागी कमांडोंच्या अन्य एका तुकडीला तैनात करण्यात आले आहे. गाजियाबादमध्ये अलिकडेच झालेल्या रोड रेजच्या घटनेनंतर गृह विभागाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. जवानांनी मारहाण केल्याचा आरोप एका डॉक्टरने केला होता.

रोड रेज प्रकरणी सीआरपीएफ महासंचालक एस. एल. थाओसेन यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कमांडोंनी एसओपीचे पालन केल्याचे प्राथमिकदृष्ट्या आढळून आल्याचे म्हटले गेले आहे. या प्रकरणी सर्व पैलूंची चौकशी झाल्यावरच एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार असल्याचे थाओसेन यांनी नमूद केले आहे.

सीआरपीएफने घटनेसंबंधी काही मोबाइल व्हिडिओ आणि पीडिताच्या प्रारंभिक वक्तव्यांच्या आधारावर एक प्रारंभिक अहवाल तयार केला आहे. याप्रकरणी केल्या जाणाऱ्या कारवाईची माहिती केंद्रीय गृहमंत्रालय तसेच कुमार विश्वास यांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थकांचे समर्थन करत असल्याचा आरोप विश्वास यांनी केला होता. यानंतर कुमार यांना धमक्या मिळू लागल्या होत्या. यामुळे केंद्र सरकारकडून त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article