कुमार विश्वास यांच्या पत्नीची ‘एसीबी’कडून चौकशी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कवी कुमार विश्वास यांच्या पत्नी आणि आरपीएससी सदस्य मंजू शर्मा यांची एसीबीच्या पथकाने बुधवारी चौकशी सुरू केली. 18 लाख ऊपयांच्या कथित लाच प्रकरणात आयोगाच्या सदस्या संगीता आर्य यांचे नाव चौकशीत पुढे येताच एसीबीचे पथक मंगळवारी आयोगाच्या सदस्या डॉ. संगीता आर्य यांच्या घरी पोहोचले. पथकाने आयोगाच्या सदस्याची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले. आता याच प्रकरणात बुधवारी एसीबीचे पथक आयोगाचे आणखी एक सदस्य डॉ. मंजू शर्मा यांचीही चौकशी करत आहे.
मंगळवारी संध्याकाळी संगीता आर्य यांच्या सरकारी बंगल्यावर चौकशी केल्यानंतर एससीबी टीमने त्यांचे जबाब नोंदवले. हे प्रकरण भटक्मया विमुक्त मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाळ केसावत यांनी 18 लाख ऊपयांची लाच स्विकारण्याशी संबंधित आहे. एसीबीमध्ये नोंदवलेल्या 193/23 संदर्भात बुधवारी एसीबीचे पथक आरपीएससी सदस्या संगीता आर्य यांच्या घरी गेले. तेथे चौकशी केल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. कार्यकारी अधिकारी भरती परीक्षेत लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
जुलै 2023 मध्ये, 18.5 लाख ऊपये घेतल्याप्रकरणी एसीबीने घुमंटू मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाल केसावत यांच्यासह चार आरोपींना अटक केली होती. आरपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारी भरती परीक्षेत भरतीच्या नावाखाली लाच घेतल्याच्या आरोपावरून एसीबीने केसवतसह चार जणांना अटक केली होती. आता या लाचखोरी प्रकरणात एसीबी डॉ. मंजू शर्मा यांची चौकशी करत आहे.