महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुद्रेमनी येथील पायी वारी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ

10:16 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /कुद्रेमनी

Advertisement

भजनी अभंगांच्या जय जयकारात कुद्रेमनी येथील श्री ज्ञानेश्वर माउली वारकरी सांप्रदाय भजनी मंडळाची कुद्रेमनी ते पंढरपूर पायीवारी दिंडी शुक्रवार दि. 9 रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. वारकऱ्यांच्या पायीवारी दिंडीचे प्रस्थान उद्घाटन कार्यक्रम गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष संजय पाटील हे होते. प्रारंभी हभप नागेश राजगोळकर यांनी प्रास्ताविक करून दिंडी नियोजनाची माहिती दिली. दिंडी मुख्य चालक अर्जुन जांबोटकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांच्याहस्ते श्ऱीफळ वाढवून पायीवारी सोहळ्याचे उद्घाटन केले. विठ्ठल रखुमाई मूर्तीचे पूजन माजी महापौर शिवाजीराव सुंठकर व सुलोचना यांच्या हस्ते झाले.

Advertisement

दि. 21 पर्यंत दिंडी प्रवास

यावेळी श्री गणेश प्रतिमापूजन ईश्वर गुरव व सिंधू गुरव, शालन व लक्ष्मण धामणेकर दांपत्यांनी केले. यानंतर ग्रा. पं. सदस्य शांताराम गुरव व कल्पना यांनी कासव पूजन, शिवाजी मुरकूटे व सुवर्णा यांनी वीणा पूजन, ग्रा.पं. उपाध्यक्षा रेणुका नाईक, आरती लोहार यांनी राधाकृष्ण मूर्ती पूजन केले. विष्णू जांबोटकर, अंकुश धामणेकर, गावडू गुरव व मल्लव्वा दांपत्यांच्या हस्ते विविध पूजन झाले. यानंतर दिंडी सोहळ्याची गावात मिरवणूक झाली. गावातील विविध गल्यांमध्ये दिंडीची आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. गणेश मंदिरातील गणेशमूर्तीचे दर्शन घेऊन पायीवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. दि. 9 ते 21 फेब्रुवारीपर्यंत बाची, सुतकट्टीफाटा, अमिनभावी, केरूरवाडी, कागवाड, भोसे, केरेवाडी, उदनवाडी, सांगोला, कासेगाव ते पंढरपूर असा दिंडीचा प्रवास होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article