महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्षत्रिय मराठा परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक 26 रोजी

10:39 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेची बैठक चव्हाट गल्ली येथील जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या कार्यालयात पार पडली. सभेस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बेळगावमध्ये सदाशिवनगर येथील 22 गुंठे जमीन माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी लीजवर दिली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून अनिल बेनके यांनी पुढाकार घेऊन तेथे मराठा भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसंदर्भात जिल्ह्यातील क्षत्रिय मराठा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक 26 जून रोजी घेण्याचे ठरले. बेळगाव जिल्ह्यात 15 लाख मराठा समाजबांधव असून या समाजासाठी काम करावयाचे आहे. सर्व समाजबांधवांना एकाच छताखाली आणून बळकटी देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. याप्रसंगी दिलीप पवार, बसवराज मॅगोटी, संजीव भोसले, डी. बी. पाटील, एस. व्ही. जाधव, मनोज पाटील, प्रमोद गुंजीकर, रोहन कदम, सुरेश पाटील, राहुल पवार आदी तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article