‘द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली’मध्ये कृतिका कामरा
ओटीटीवर आता ‘द ग्रेट शम्सुद्दीन पॅमिली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यात कृतिका कामरा मुख्य भूमिकेत आहे. यात बानी नावाच्या युवतीची कहाणी असून ती स्वत:ची पसंती आणि परिवाराच्या जबाबदाऱ्यांदरम्यान अडकून पडली आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात पूरब कोहली, श्रेया धन्वंतरी, जूही बब्बर, शीबा चड्ढा आणि डॉल अहलूवालिया यांची झलक दिसून येते. तसेच फरीदा जलाल दीर्घकाळाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
दिल्लीच्या या परिवारासोबत एका दिवसात काय घडते यावर हा चित्रपट बेतलेला आहे. कृतिकाने यात बानी अहमद या लेखिकेची भूमिका साकारली आहे. तिच्यासमोर स्वत:च्या कारकीर्दीत 12 तासांची आवश्यक डेडलाइन आहे. परंतु तिची आई, मावशी, भाऊबहिण आणि पूर्वाश्रमीचा प्रियकर सर्व एकामागोमाग अपार्टमेंटमध्ये आल्याने तिचे वेळापत्रक कोलमडून पडत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
एकीकडे 12 तासांची डेडलाइन तर दुसरीकडे परिवाराच्या प्रत्येक सदस्याची स्वत:ची अशी इमर्जन्सी आहे. बानी अहमद या अनोख्या कौटुंबिक संकटात सापडली आहे. प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफला हाताळणे सोपे नसल्याचे दाखविणारा हा चित्रपट आहे. ‘द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली’ चित्रपटाला अनुषा रिझवीने दिग्दर्शित पेल आहे. तिने यापूर्वी ‘पीपली लाइव’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा चित्रपट 12 डिसेंबर रोजी जियो हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे.