For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार क्रीति

06:43 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार क्रीति
Advertisement

रोमँटिक धाटणीचा असणार चित्रपट

Advertisement

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा बॉलिवूडमधील प्रतिभावंत कलाकारांपैकी एक आहे. त्याने शेरशाह, एक विलेन, मिशन मजनू आणि कपूर अँड सन्स यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सिद्धार्थ यापूर्वी योद्धा या चित्रपटात दिसून आला होता. या चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नव्हते.

चाहते आता त्याच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. सिद्धार्थ आता लवकरच एका रोमँटिक चित्रपटात दिसून येणार आहे. सिद्धार्थसोबत या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री क्रीति सेनॉन मुख्य भूमिका साकारणार आहे. मॅडॉक फिल्म्सकडून निर्मित या चित्रपटात ही नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. दोघांनाही मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असणार आहेत.

Advertisement

सिद्धार्थने मुराद खेतानी यांच्या चित्रपटात काम करण्यास होकार दर्शविला आहे. तर क्रीति ही यापूर्वी क्रू या चित्रपटात करिना कपूर आणि तब्बूसोबत दिसून आली होती. तसेच लवकरच ती काजोलसोबत दो पत्ती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  क्रीतिने या चित्रपटाच्या निर्मितीतही योगदान दिले आहे.

Advertisement
Tags :

.