कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्रिस्टन स्टीवर्टचा प्रेयसीसोबत विवाह

06:53 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

6 वर्षांपासून डायलन मेयरला करत होती डेट

Advertisement

‘ट्वाइलाइट’ चित्रपटाच्या सीरिजमुळे चर्चेत राहिलेली हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टने विवाह केला आहे. तिने स्वत:च्या गर्लफ्रेंडला आयुष्याची जोडीदार केले आहे. क्रिस्टन सुमारे 6 वर्षांपासून डायलन मेयरला डेट करत होती. दोघांच्या विवाहाची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित झाली आहेत. क्रिस्टन स्टीवर्ट आणि पटकथालेखिका डायलन मेयरने अखेर परस्परांशी विवाह केला आहे. ‘ट्वाइलाइट’ स्टारने लॉस एंजिलिसमध्ये एका खासगी सोहळ्यात स्वत:ची लॉन्गटाइम गर्लप्रेंडसोबत विवाह केला. क्रिस्टने तीन वर्षांपूर्वी डायलनसोबत एंगेजमेंट केली होती.

Advertisement

35 वर्षीय क्रिस्टन आणि 37 वर्षीय डायलने लॉस एंजिलिस येथील निवासस्थानात विवाहाच्या आणाभाका घेतल्या आहेत. या सोहळ्याला केवळ त्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते. मॅरेज लायसन्स मिळाल्यावर विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

क्रिस्टन आणि डायलनची भेट एका चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान झाली होती. ऑगस्ट 2019 मध्ये दोन्ही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली होती. मग ऑक्टोबर 2019 मध्ये दोघांनी स्वत:च्या नात्याची कबुली दिली होती. स्वत:च्या नात्याला पुढे नेत त्यांनी 2021 मध्ये एंगेजमेंट केली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article