महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कृष्णराज महाडिक ‘डिजिटल स्टार ऑफ महाराष्ट्र’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव

08:02 PM Jan 30, 2024 IST | Abhijeet Khandekar
Krishnaraj Mahadik
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा डिजिटल मिडिया संपादक संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात डिजिटल स्टार ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. श्रीमंत शाहू छत्रपती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाडिक यांना शाल, श्रीफळ आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

डिजिटल मिडिया संपादक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन कणेरी येथील सिद्धगिरी मठावर झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कृष्णराज हे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र असून, बालवयातच त्यांनी कार रेसिंगच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले. त्यानंतर देश-विदेशात झालेल्या अनेक कार रेसिंग स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी करत, लक्षवेधून घेतले. गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर ते प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यांचे व्लॉग वाचणाऱ्यांची यांची संख्या कोटीच्या घरात आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यातून मिळणारे उत्पन्न त्यांनी कष्टकरी, गरजू आणि वंचित लोकांसाठी खर्च केले आहेत. त्यामध्ये निराधारांना अन्न, औषधे आणि कपडे वाटप, पावसामुळे घर पडलेल्या वृध्देला नवीन घर बांधून देणे, साडी वाटप, उबदार ब्लँकेट वाटप, रिक्षाचालकांना दरवाजे आणि मीटर वाटप असे शेकडो उपक्रम कृष्णराज यांनी आजपर्यंत राबवले आहेत. शहर सुशोभिकरणासाठी त्यांनी योगदान दिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
DCM Ajit PawarDigital StarKrishnaraj Mahadiktarun bharat news
Next Article