For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Karad News : 'कृष्णा' एआय तंत्रज्ञानात घेणार पुढाकार ...

04:53 PM Oct 17, 2025 IST | NEETA POTDAR
satara karad news    कृष्णा  एआय तंत्रज्ञानात घेणार पुढाकार
Advertisement

कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट 

Advertisement

कराड : अलिकडे सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. येत्या काळात शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी कृष्णा कारखाना ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुढाकार घेणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे.

कृष्णा कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाच्या मुहूर्तप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले जगदीश जगताप, लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, जे.डी. मोरे, विलास भंडारे, इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून, यंदा १५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. वेळेत ऊसतोड देण्यासंदर्भात, तसेच तोडणीबाबतच्या कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत, याबाबत काळजी घेतली जात आहे.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने पारदर्शक आणि उत्कृष्ट कारभार केला आहे. कृष्णा कारखाना हा परिवार मानून याठिकाणी काम करणाऱ्या सेवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कृष्णा कारखाना संलग्नित सहकारी तत्वावरील उपसा जलसिंचन योजनांना भरघोस मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

प्रारंभी संचालक बाजीराव निकम व त्यांच्या पत्नी सौ. अलका निकम यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. कार्यक्रमाला माणिकराव पाटील, प्रसाद पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, शंकरराव खबाले, राजेंद्र पाटील, आबासो गावडे, हणमंतराव जाधव, माणिकरावजाधव, आप्पासो कदम, भगवानराव पाटील, जयवंतराव साळुंखे आदी मान्यवरांसह कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत केले. जगदीश जगताप यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. लिंबाजी पाटील यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.