कृष्णेची पातळी २० फुट तर कोयनेत ४ टीएमसी वाढ! पाणलोट क्षेत्रातसह जिल्हयातही मुसळधार, सांगलीत मनपा सतर्क
सांगली प्रतिनिधी
धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्हयात झालेल्या जोरदार पावसाने कृष्णा आणि वारणा नदीच्या पातळीत वेगाने वाढ झाली आहे. प्रशासन सतर्क झाले असून महापालिकेने वॉर रूम सुरू केली आहे. आयर्विन पुलाजवळ सध्या 20 फुट पातळी आहे. ही पातळी 25 वर पोहोचल्यास सुर्यवंशी प्लॉट मध्ये पाणी शिरते. नदीकाठच्या लोकांना स्थलांतरासाठी 36 निवारा केंद्रांची तयारी करण्यात आली आहे.
कोयना, वारणा आणि अलमट्टी धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणात रात्रीत चार टीएमसीने वाढ झाली. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी बारा तासात सात फुटावरून वीस फुटापर्यंत पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात सरासरी 39मिमी पेक्षा जादा पावसाची नोंद झाली आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक 71 मिमी पाऊस झाला आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. चिकुर्डे येथील जुना पूल, पलुस तालुक्यातील कृष्णेवरील नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. महापालिकेची आपत्ती निवारण यंत्रणा अलर्ट झाली आहे. आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी यासंदर्भात सोमवारी आढावा घेतला. संपर्क, ा†नवारा, मदत, सुटका आणि पुनर्वसनबाबत नियोजन पूर्ण झाले आहे. चारपाच दिवसांच्या खंडानंतर रविवारी दिवसभर पावसाने जोरदार बॅटींग केली. महाबळेश्वर, नवजा, कोयना, वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातही दिवसभर पावसाने उघडीप दिली नाही.
अलमट्टीकडील दुर्लक्ष सांगली कोल्हापूरची धास्ती वाढवणारे
दरम्यान सांगली कोल्हापूर जिल्हयाच्या महापुराला अलमट्टी धरणातील पाणीसाठा कारणीभूत असल्याचे यापुर्वी स्पष्ट झाले आहे. या धरणातील पाणीसाठा केंद्रीय जलआयोगाच्या नियमानुसार ठेवण्यासाठी विविध संघटना प्रयत्नशील आहेत. अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक पाटबंधारेबरोबर समन्वय ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 123 टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात 91 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात आवक वाढत असताना विसर्ग कमी करण्यात आला आहे. हे दुर्लक्ष सांगली कोल्हापूरची धास्ती वाढवणारे आहे.
वारणा धरणात 19.90 टी.एम.सी. पाणीसाठा
वारणा धरणात सोमवारी 19.90 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. आहे. ा†वा†वध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 40.43 (105.25), धोम 4.91 (13.50), कन्हेर 3.85 (10.10), वारणा 19.90 (34.40), दूधगंगा 10.56 (25.40), राधानगरी 4.59 (8.36), तुळशी 1.92 (3.47), कासारी 1.65 (2.77), पाटगांव 2.65 (3.72), धोम बलकवडी 0.92 (4.08), उरमोडी 2.47 (9.97), तारळी 2.27 (5.85), अलमट्टी 91.66 (123).
खरीप पिकांसाठी लाभदायक पाऊस
जिल्ह्यात झालेल्या संततधारेमुळे खरीप हंगामातील पिकांना चांगला लाभ झाला असून शेतकरी सुखावला आहे. तासगाव शहरासह तालुक्यात रविवारी रात्रीपासून ा†दवसभर पावसाने हजेरी लावली. दरम्यान शिराळा तालुक्यातील पावसाने काहीकाळ उघडीप दिली आहे