For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूर मुख्य न्यायाधीशपदी कृष्णकुमार

06:27 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
मणिपूर मुख्य न्यायाधीशपदी कृष्णकुमार
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 

Advertisement

न्या. डी. कृष्णकुमार यांची नियुक्ती मणिपूर राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांच्या नियुक्तीची सूचना केंद्र सरकारला केली होती. या सूचनेवर त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मणिपूर उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल हे आज गुरुवारी निवृत्त होत आहेत. त्यांच्या स्थानी आता न्या. कृष्णकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. कृष्णकुमार हे सध्या मद्रास उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश आहेत. त्यांना आता मुख्य न्यायाध्शीपदी पदोन्नती दिली जात आहे, अशी घोषणा केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिली आहे. कृष्णकुमार हे मागासर्गिय समाजातील असून सध्या ते मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनंतर त्यांची ज्येष्ठता आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement

.