For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमएलआयआरसीतर्फे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात

11:39 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
एमएलआयआरसीतर्फे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात
Advertisement

बेळगाव : येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. मिलिटरी महादेव मंदिराच्या आवारात खास दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी थरावर थर रचत दहीहंडी फोडून जल्लोष केला. प्रारंभी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी दहीहंडीचे पूजन केले. हा सोहळा पाहण्यासाठी एमएलआयआरसीचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय व जवान बहुसंख्येने उपस्थित होते. जन्माष्टमी म्हणजे केवळ आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन नव्हे तर ती आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. याच हेतूने सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतानासुद्धा जवानांनी शिस्तीचे दर्शन घडविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.