महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कृष्णा, धिरीजा, श्रीवर्धन, जयची जलतरणसाठी महाराष्ट्र संघात निवड

05:55 PM Nov 22, 2024 IST | Radhika Patil
Krishna, Dhirija, Shrivardhan, Jay selected in Maharashtra team for swimming
Advertisement

कोल्हापूर : 
पुण्यातील म्हाळुंगे, बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये विवेकांनद कॉलेजच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत जलतरण स्पर्धेत वर्चस्व राखले. कृष्णा शेळके, धिरीजा मोरे, जय शहा यांची जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

Advertisement

सांघिक जलतरण रिले क्रीडा प्रकारात : 19 वर्षाखालील मुली व मुले : 100 x 4 मिडले रिले व 100 x 4 फ्री रिले : रौप्य पदक खेळाडू नावे : मुली : कृष्णा शेळके, धिरीजा मोरे, स्नेहल पाटील, रिया पाटील. मुले : जय शहा, आदित्य कुंभार, प्रथमेश बेरड, श्रीकृष्ण शिंगाडे वैयक्तिक जलतरण क्रीडा प्रकार : कृष्णा शेळके : बारावी कॉमर्स 100 मीटर बॅकस्ट्रोक : कास्य पदक, 400 मीटर फ्री स्टाईल : रौप्य पदक पटकावले. धिरीजा मोरे बारावी सायन्स 200 मीटर बॅक स्ट्रोक : रौप्यपदक, 400 मीटर फ्री स्टाईल : कास्य पदक श्रीवर्धन पाटील : बारावी सायन्स (17 वर्षांखालील मुले) 50 मीटर फ्री स्टाईल : सुवर्णपदक, 100 मी. फ्री स्टाईल : रौप्यपदक, 100 मी बटलफ्लाय : रौप्यपदक जय शहा : बारावी कॉमर्स 100 मीटर बटरफ्लाय : सुवर्णपदक 50 मीटर बॅकस्ट्रोक : सुवर्णपदक 100 मीटर बॅकस्ट्रोक : रौप्यपदक अशा प्रकारे कृष्णा शेळके, धिरीजा मोरे, श्रीवर्धन पाटील, जय शहा खेळाडूंची राजकोट येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

Advertisement

त्यांना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अध्यक्ष कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, रजिस्ट्रार आर. बी. जोग, सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article