महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कृष्णपदवी

06:14 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

श्रीकृष्णांनी आत्मज्ञानी असण्याचे दर्शन वर्तणुकीतून कसे दाखवले त्याबद्दल शुकमुनी परीक्षित राजाला सांगत आहेत. ते म्हणाले, आत्मज्ञानी व्यक्तीची अतिगुह्य लक्षणे त्यांच्या वागण्याबोलण्यातून नेहमीच व्यक्त होत असत.

Advertisement

उदाहरणार्थ इतरांच्या वागण्याचा त्रास होऊन त्यांचे विकार बळावलेत. त्यामुळे त्यांच्या हातून गैरवर्तणूक झाली असा प्रसंग कधी घडला नाही. संपूर्ण निरिच्छ स्वभाव असल्याने ते कायम शांतीरूप होऊन राहिले. त्यांच्या देहाची ख्याती असल्याने त्यांच्या केवळ दर्शनाने दिनदुबळ्यांचा उद्धार होत असे. त्यामुळे सुरनर त्यांना वंदन करत असत. त्यांच्या देहाची ख्याती तिन्ही लोकात वर्णन करून सांगितली जात असे.

सर्वांनी सात्विक हेवा करावा असा देह त्यांना लाभला असला तरी त्याबद्दल कसलाही अहंकार न बाळगता त्याचा त्याग करून श्रीपती निजधामाला निघून गेले. जाताना आपली सगुण मूर्ती आपल्या भक्तांच्या ध्यानात सदैव राहील अशी व्यवस्था त्यांनी केली. त्यामुळे भक्तांच्या नजरेसमोर ते सदैव शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या सगुण रुपात तरळत असतात आणि ते त्यांच्यावर प्रसन्न झाले की, त्या रुपात ते त्यांना सदेह दर्शन देत असतात.

म्हणून असं म्हणता येईल की, श्रीकृष्णांनी देहाचा त्यागही केला नाही की बरोबरही नेला नाही, त्यांनी तो लीला विग्रहाने संकुचित करून ठेवला. स्वत: निजात्मयोगाने ते निजधामाला गेले आणि स्वत:च्या भक्ताच्या ध्यानी त्यांनी सूक्ष्मरूपाने देहाची स्थापना केली. प्रत्यक्ष हजर असलेल्या देवांना ते आत्ता समोर दिसत होते आणि बघता बघता नाहीसे झाले असे वाटले असले तरी ते त्यांनी नियोजनपूर्वकच केले होते.

त्यांच्यालेखी भक्ताचे महात्म्य अनन्यसाधारण असल्याने फक्त त्यांच्यासाठी त्यांनी स्वत:च्या देहाचा संकोच केला आणि तो भक्तांच्या ध्यानासाठी सुरक्षित ठेवला. अवताराच्या शेवटी श्रीकृष्णांनी ज्या परमगतीने निजधाम जवळ केले त्याला अति उत्कृष्ट योगस्थिती असं म्हणतात आणि ती निश्चितच सुरवरांच्या तर्काच्या पलीकडे असल्याने त्यांना अतर्क्य अशीच होती. श्रीकृष्णांच्या निजधामाला जाण्याच्या गतीला परमगती असं म्हणतात कारण वेद्शास्त्राच्या सांगण्यानुसार ह्याच्याहून वरची गती अस्तित्वातच नसते. म्हणून त्याला परमपदवी असं म्हणतात.

ह्या परमपदवीचे महात्म्य एव्हढे आहे की, जो कुणी सकाळच्यावेळी भक्तियुक्त अंत:करणाने ही चौदा श्लोकांची ‘श्रीकृष्णपरमपदवी’ वाचेल आणि हे चौदा श्लोक वारंवार वाचून पाठ करून त्याचे पठण करेल तो उत्तमत्वाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याने प्राणांतापर्यंत हे पठण चालू ठेवले पाहिजे. ह्या श्रीकृष्णपरमपदवीच्या चौदा श्लोकांचे रोज जो गायन करेल त्याचे पाय चारही मुक्ती धरतील आणि त्याच्या दासी होतील. एव्हढे हे श्लोक महत्वाचे आहेत.

विशेष म्हणजे, जरी चारही मुक्ती दासी झाल्या तरी त्यांच्याकडे उद्धवाने केले तसे दुर्लक्ष पठण करणाऱ्याने केले तर त्याला श्रीकृष्णपदवी प्राप्त होईल. त्यामुळे भगवंत ज्या गतीने निजधामाला गेले त्यासाठी आवश्यक असलेली उत्कृष्ठ योगस्थिती प्राप्त होईल. शास्त्राr पंडितही तिचा आदराने उल्लेख करतात. श्रीकृष्णपरमपदवीचे हे चौदा श्लोक म्हणजे चौदा विद्यांचे जन्मस्थान आहे. सकाळी ह्या श्लोकांचे पठण करून कृष्णपदवी प्राप्त झालेल्या भक्ताला त्या चौदा विद्या पूर्णपणे अवगत होतील. ह्या चौदा श्लोकांच्या आधारावर चौदा भुवने चालतात. सकाळी ह्या श्लोकांचे पठण करून कृष्णपदवी प्राप्त झालेल्या भक्ताला ती चौदा भुवने प्राप्त होतील. तसेच त्याला चौदा पदें गयावर्जन करून पिंडदान केल्याचे समाधान मिळेल.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article