महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोझिकोड भारतातील पहिले ‘सिटी ऑफ लिटरेचर’

06:22 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्वाल्हेरने संगीताच्या श्रेणीत मिळविले स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/ कोझिकोड

Advertisement

समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध केरळमधील शहर कोझिकोडला युनेस्कोने अधिकृत स्वरुपात भारतातील पहिले सिटी ऑफ लिटरेचर म्हणून घोषित केले आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये कोझिकोडने युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या (युसीसीएन) साहित्यश्रेणीत स्थान मिळविले होते. कोझिकोड शहराला पूर्वी कालिकत या नावाने ओळखले जात होते.

कोझिकोडने कोलकात्यासारख्या समृद्ध सांस्कृतिक इतिहास असलेल्या शहराला मागे टाकत युनेस्कोकडून ‘सिटी ऑफ लिटरेचर’चा मान मिळविला असल्याचे उद्गार राज्याचे मंत्री एम.बी. राजेश यांनी काढले आहेत. कोझिकोडमध्ये 500 हून अधिक पुस्तकालयं आहेत. हे शहर अनेक दशकांपासून प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांच्या साहित्यिक प्रवासाचे केंद्र राहिले आहे. तसेच एस.के. पोट्टक्कड अणि वैकोम मुहम्मद बशीर यासारख्या महान साहित्यिकांसाठी या शहराला ओळखले जाते.

युसीसीएनच्या यादीत 55 नव्या शहरांचा समावेश झाला असून यात कोझिकोड समवेत ग्वाल्हेरलाही स्थान मिळाले आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहराने संगीत श्रेणीत प्रतिष्ठित यादीत स्थान मिळविले. तर कोझिकोडने साहित्यश्रेणीत स्थान प्राप्त केले आहे. केरळ सरकारने आता दरवर्षी 23 जून रोजी साहित्य शहर दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे.

जगातील ज्या अन्य शहरांना युनेस्कोकडून टॅग प्राप्त झाला आहे, त्यात शिल्प आणि लोककला श्रेणीत बुखारा, मीडिया आर्टस श्रेणीत कॅसाब्लांका, डिझाइन श्रेणीत चोंग्किंग, चित्रपट श्रेणीत काठमांडू सामील आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article