कोतवडे जि. प. गटात उदय सामंतांच्या प्रचाराचा झंझावात
रत्नागिरी :
कोतवडे जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये विधानसभा निवडणुकीतील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे. स्वतः उदय सामंत समजून प्रत्येक कार्यकर्ता प्रचारामध्ये उतरला आहे. या कार्यकर्त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कोतवडे जिल्हा परिषद गटामध्ये सामंत यांना जास्तीत-जास्त मताधिक्य देण्यासाठी कंबर कसली आहे.
कोतवडे येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये सामंत यांच्या प्रचाराचा नारळ फोडून गावामध्ये घरोघरी प्रचार सुरु केला. यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन उर्फ आबा पाटील, विभागप्रमुख स्वप्निल उर्फ तारक मयेकर, विभाग संघटक तुफिल पटेल, सरपंच संतोष बारगोडे, महिला आघाडीच्या उपतालुकाप्रमुख ज्योती मयेकर, विभागीय कार्यालयप्रमुख विनू काका सहस्रबुद्धे, दातार सर, 'प्रकाश वारेकर, बाळू वारेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.