कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ
वृत्तसंस्था/ इक्सेन (दक्षिण कोरिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2024 च्या कोरिया मास्टर्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवार पासून प्रारंभ झाला. दक्षिण कोरियाची राजधानी इक्सेनमध्ये ही स्पर्धा घेतली जात आहे. मात्र भारतातर्फे एकमेव बॅडमिंटनपटू किरण जॉर्ज या स्पर्धेत सहभागी झाला आहे.
सुरुवातीला या स्पर्धेत भारताचे किरण जॉर्ज, आयुष शेट्टी आणि इमाद फरुखी समिया हे तीन बॅडमिंटनपटू सहभागी होणार होते. पण अलिकडेच झालेल्या जर्मनीतील हायलो बॅडमिंटन स्पर्धेत शेट्टीने उपांत्य फेरीत गाठली होती. पण त्यांनी शेटवच्या क्षणी दक्षिण कोरियातील या स्पर्धेतून माघार घेतली आहे. महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी इमाद फरुखी समियाने आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याचे कळविल्याने आता किरण जॉर्ज एकमेव बॅडमिंटनपटू भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. किरण जॉर्जचा या स्पर्धेत पुरुष एकेरीचा सलामीचा सामना व्हिएतनामच्या डेंगशी होणार आहे. चालू वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात किरण जॉर्ज आपला हरवलेला फॉर्म मिळविण्यासाठी झगडत आहे.