इचलकरंजीच्या डॉनबरोबर कोराणेचा मटका व्यवसाय
कोल्हापूर :
मोक्याच्या गुह्यात पोलीस कोठडीत असलेल्या मटकाकिंग सम्राट सुभाष उर्फ बबनराव कोराणे (रा. वेताळमाळ तालीमशेजारी, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याची पोलिसांनी कसून चौकशी सुऊ केली आहे. चौकशीत त्याच्याकडून फरारी काळात आश्रयाला कोठे थांबला, आश्रय कोणी दिला. याची माहिती घेतली जात आहे. याचदरम्यान त्याने फरारी काळातसुध्दा इचलकरंजीतील कुख्यात डॉन बरोबरीच्या भागिदारीत मटका व्यवसाय सुऊच ठेवल्याची माहिती दिली आहे, अशी माहिती सुत्रानी दिली.
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये दाखल (मोका) गुह्यात मटकाकिंग सम्राट कोराणे सुमारे सहा वर्षे फरारी होता. 5 फेब्रुवारी रोजी तो जिल्हा व सत्र न्यायालयात शरण आला होता. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. याचदरम्यान पोलिसांनी याच गुह्यातील त्याचा फरारी साथिदार प्रकाश उर्फ पप्पू सावला (रा. बोरीवली, मुंबई) हा सध्या कोठे आश्रयाला आहे. तसेच तो फरारी असताना सुमारे सहा वर्षे कोठे-कोठे आश्रयाला थांबला होता. तो आश्रय कोणी दिला. याबाबत त्याच्याकडे चौकशी सुऊ केली आहे. चौकशीमध्ये त्याने बेळगाव, बेंगलोर (राज्य कर्नाटक) या दोन जिह्यासह गोवा, मुंबई, दिल्ली आदी शहरात काही दिवस आश्रयाला थांबल्याचे सांगितले आहे, अशी माहिती सुत्रानी दिली.
याचदरम्यान त्याच्याकडे त्याच्या अवैध मटक्या धंद्यासह अन्य धंद्याबाबतची माहिती पोलिसांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने फरारी असताना सुध्दा आपला बेकायदेशिर मटका धंदा इचलकरंजीतील एका कुख्यात डॉनच्या भागिदारीत सुऊ होता. त्या संबंधीत डॉनने आणि मी स्वत: आपल्या समर्थक कार्यकर्त्याच्या नावाने मटकाबुकी सुऊच ठेवल्याची कबुली चौकशीदरम्यान पोलिसांना दिली, अशी माहिती सुत्रानी दिली.