ऑस्ट्रेलिया अ संघात कोंटासचा समावेश
वृत्तसंस्था / मेलबोर्न
इंडिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 जणांच्या ऑस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व नाथन् मॅकस्विनेकडे सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये नवोदित आक्रमक फलंदाज सॅम कोंटासला संधी देण्यात आली आहे.
इंडिया अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात पहिला सामना मॅके येथे 31 ऑक्ठोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान तसेच दुसरा सामना मेलबोर्न येथे 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळविला जाईल. शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात 19 वर्षीय सॅम कोंटासने दोन शतके झळकविल्याने त्याचा ऑस्ट्रेलियन अ संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघ: नाथन् मॅकस्विने (कर्णधार), बॅनक्रॉप्ट, बोलॅन्ड, बंकीमहॅम, कोनोली, डेव्हिस, हॅरीस, कोंटास, मॅकअॅन्ड्रीव्ह, मिचेल मिसेर, मर्फी, ओनील, पियर्सन, फिलीपी, रॉचीसोली, स्टिकेटी आणि वेबस्टर.