कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोलकाता, राजस्थान पहिल्या विजयासाठी सज्ज,

06:55 AM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

Advertisement

मागील सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करता न आल्यानंतर जेतेपद पटकावणारे कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आज बुधवारी येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा जलदगतीने सुधारणा घडविण्यावर त्यांचे लक्ष केंद्रीत राहील.

Advertisement

स्पर्धेच्या सुऊवातीच्या सामन्यात नाईट रायडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने सात गड्यांनी पराभव केला, तर रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादने 44 धावांनी पराभव केला. त्या पराभवांमध्ये दिसणारा समान मुद्दा असा की, केकेआर आणि राजस्थानचे वरवर पाहता शक्तिशाली दिसणारे फलंदाजी आणि गोलंदाजी विभाग प्रत्यक्षात अपयशी ठरले. राजस्थान संघ त्यांच्या गोलंदाजीची लय बिघडण्यास हैदराबादच्या खेळपट्टीवर खेळण्याचे निमित्त देऊ शकतो, परंतु कोलकाता संघाकडे असे कोणतेही कारण नाही.

सुनील नरेन वगळता केकेआरच्या गोलंदाजांपैकी कोणीही आरसीबीच्या फलंदाजांना रोखू शकला नाही आणि त्यातच गूढ फिरकी गोलंदाज वऊण चक्रवर्तीबद्दल त्यांना थोडी चिंता वाटू शकते. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर फिरकीस थोडीफार मदत होत होती. पण तिथेही चक्रवर्तीला फिल सॉल्ट आणि विराट कोहलीँनी झोडपले. हा फिरकी गोलंदाज गुवाहाटीच्या खेळपट्टीवर सुधारित कामगिरी करेल, अशी केकेआरला आशा असेल. पाठीच्या दुखण्यातून सावरत असलेल्या नॉर्त्जेच्या तंदुऊस्तीवरही त्यांचे लक्ष राहील. जर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला फिजिओकडून हिरवा कंदील मिळाला तर तो स्पेन्सर जॉन्सनची जागा घेईल.

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि नरेनने धमाकेदार सुऊवात करून दिल्यानंतर केकेआरची मधली फळी कोसळली आणि अखेर त्यांना कमी धावसंख्येवर समाधान मानावे लागले. वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेलसारखे त्यांचे फलंदाजीतील मुख्य आधारस्तंभ आडव्या बॅटने खेळताना बाद झाले. ते गुवाहाटीत अधिक जबाबदारीने खेळ करतील, अशी केकेआरला आशा असेल. याशिवाय रिंकू सिंगने आपली फटकेबाजीची क्षमता पुन्हा दाखवावी, अशी अपेक्षाही असेल. चांगल्या धावसंख्येचे रूपांतर मोठ्या धावसंख्येत करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. त्याचा अलीकडचा टी-20 फॉर्म तितका उत्साहवर्धक नाही आणि गेल्या पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रिंकूने 11, 9, 8, 30, 9 आणि आयपीएलच्या पहिल्या सामन्यात 12 धावा केलेल्या आहेत.

रिंकू आणि केकेआरमधील त्याचे वरच्या फळीतील सहकारी राजस्थानच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा येथे त्यांची लय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, अशी आशा बाळगून असतील. हैदराबादविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा जोफ्रा आर्चर, फजलहक फाऊकी आणि महेश थीक्षाना यांच्यासारखे खेळाडू ट्रॅव्हिस हेड आणि इशान किशन यांच्या आक्रमक फलंदाजीसमोर निष्प्रभ ठरले होते. आर्चरने त्याच्या षटकांत 76 धावा दिल्या. परंतु गुवाहाटीत त्यांना त्यांचा फॉर्म परत मिळवण्याची चांगली संधी आहे. संघाचा कर्णधार रियान परागही मैदानावर कधी कधी गोंधळलेला दिसलेला आहे. राहुल द्रविड प्रशिक्षित संघाला केकेआरविऊद्ध परागकडून अधिक सक्षम नेतृत्वाची अपेक्षा असेल.

संघ : कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानुल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, लव्हनिटी सिसोदिया, वेंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, मोईन अली, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, एनरिच नोर्टजे, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, सुनील नरेन, वऊण चक्रवर्ती, चेतन साकारिया.

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कार्यकारी कर्णधार), संजू सॅमसन, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, कुणाल राठोड, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, नितीश राणा, युधवीर सिंग, जोफ्रा आर्चर, महीश थीक्षाना, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय सिंग, तुषार देशपांडे, फजलहक फाऊकी, क्वेना मफाका, अशोक शर्मा, संदीप शर्मा.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article