For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलकाता, लखनौ आज गती कायम राखण्यास उत्सुक

06:50 AM Apr 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोलकाता  लखनौ आज गती कायम राखण्यास उत्सुक
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

ईडन गार्डन्सवर आज मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणाऱ्या सामन्यात सुनील नरेन व त्याची प्रतिकृती मानला जाणारा खेळाडू आणि त्याचा सर्वांत मोठा चाहता दिग्वेश राठी हे आमनेसामने येतील. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन विजयांतून चार गुण मिळवले आहेत

कोलकातासाठी आतापर्यंत हंगाम मिश्र राहिलेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि मुंबई इंडियन्सकडून सुऊवातीच्या पराभवानंतर केकेआरने त्यांच्या मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर त्यांची मधली फळी त्यात चमकली आणि त्यांचा सर्वांत महागडा खेळाडू वेंकटेश अय्यर अखेर यशस्वी झाला. याशिवाय रिंकू सिंग आणि अनुभवी अजिंक्य रहाणे यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. तऊण खेळाडू अंगक्रिश रघुवंशीनेही त्याच्या तंत्राने लक्ष वेधले आहे.

Advertisement

पण नाईट रायडर्ससाठी अजूनही एक चिंतेचा विषय आहे आणि तो म्हणजे त्यांची खराब सलामी. क्विंटन डी कॉक आणि सुनील नरेन या सलामीवीर जोडीला गेल्या हंगामात फिल सॉल्टने जशी शानदार सुऊवात करून दिली होती तशी सुरुवात करून देता आलेली नसून त्यांना संघर्ष करावा लागला आहे. नरेन खराब  फॉर्ममध्ये दिसत असून त्याच्या जागी रघुवंशीला डी कॉकसोबत पाठविण्यात आले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

गोलंदाजीत नरेन आणि राठी यापैकी कोण प्रभावी ठरतो हे पाहणे रंजक ठरेल. राठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून 7.62 च्या प्रभावी इकोनॉमी रेटने सहा बळी घेतले आहेत. षटकामागे आठपेक्षा जास्त धावा त्याने एकदाच दिल्या आहेत. त्याची गोलंदाजी अपवादात्मक असली, तरी मैदानावरील त्याची यश साजरे करण्याची पद्धत मात्र वादात सापडली आहे. त्याला आधीच दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे तो 3 डिमेरिट पॉइंट्सपासून म्हणजे एका सामन्याच्या निलंबनापासून एका पॉइंटने दूर आहे.

लखनौमध्ये मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवलेला असल्याने एलएसजीचा उत्साह वाढलेला आहे. वरच्या फळीत त्यांचा मिचेल मार्श चांगली फटकेबाजी करत असून एडेन मार्करमही मुंबईविरुद्ध प्रभावी अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतला आहे. तथापि, रिषभ पंत आतापर्यंतच्या खराब कामगिरीमुळे टीकेचे लक्ष्य बनलेला असून या एलएसजी कर्णधारावरचा दबाव वाढत आहे.

संघ-कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मनीष पांडे, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वऊण चक्रवर्ती, एनरिक नॉर्टजे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लुवनीथ सिसोदिया, मोईन अली, रोवमन पॉवेल, मयंक मार्कंडे, रहमानउल्ला गुरबाज आणि चेतन साकारिया.

लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, आकाश दीप, आकाश सिंग, आवेश खान, आयुष बडोनी, मॅथ्यू ब्रेट्झके, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, हिम्मत सिंग, शमर जोसेफ, आर्यन जुयाल, अर्शिन कुलकर्णी, एडन मार्करम, मिचेल मार्श, डेव्हिड मिलर, निकोलस पूरन, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, शार्दुल ठाकूर आणि मयंक यादव.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.

Advertisement
Tags :

.