महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘कोल्हापुरी फुटबॉल’ हंगामाचा 15 डिसेंबरला किकऑफ

05:16 PM Dec 07, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

केएसए साखळी स्पर्धेने हंगामास प्रारंभ : स्पर्धेत प्रथमच टायब्रेकरचा अवलंब; वेळापत्रक, नियामावली व आचारसंहिता जाहीर; पाटाकडील तालीम मंडळ विरूद्ध झुंजार क्लब यांच्यात सलामीची लढत

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूरच्या फुटबॉल शौकिनांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरी फुटबॉल हंगामाचा शुक्रवार 15 रोजी किक ऑफ होत आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित श्री शाहू छत्रपती के.एस.ए. साखळी फुटबॉल स्पर्धेने हंगामास प्रारंभ होणार आहे. पाटाकडील तालीम मंडळ ब विरुद्ध झुंजार क्लब यांच्यामध्ये हंगामातील पहिली लढत होईल. तर दुपारी चार वाजता शिवाजी तरुण मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये सामना होईल. केएसएने स्पर्धेतील सामन्यांचे वेळापत्रक, नियम व आचारसंहिता बुधवारी जाहीर केली. स्पर्धेत यंदा प्रथमच टायब्रेकरचा अवलंब करण्यात येणार असल्याचे सेक्रेटरी राजेंद्र दळवी, जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी सांगितले.

Advertisement

सिनियर-8 गटातील सर्व सामने दुपारी 1.30 वाजता व सुपर सिनियर -8 (वरिष्ठ गट) गटातील सामने सायंकाळी 4 वाजता होणार आहेत. हंगामात केएसए साखळी सामन्यातील स्पर्धेत विजयी संघाला तीन गुण मिळणार आहेत. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन शाहू छत्रपती केएसए साखळी फुटबॉल स्पर्धेतील 56 सामन्यांचे वेळापत्रक तयार केले आहे. पहिला सामना 15 डिसेंबर रोजी झुंजार क्लब आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्या दुपारी दीड वाजता होणार आहे. स्पर्धेतील शेवटचा सामना शिवाजी तरुण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ-अ यांच्यात होणार आहे.

Advertisement

सिनियर-8 गटातील संघ :
या गटामध्ये झुंजार क्लब, बीजीएम स्पोर्ट्स, संध्यामठ तरुण मंडळ, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ ब, सोल्जर्स ग्रुप, कोल्हापूर पोलीस, सम्राट नगर स्पोर्ट्स या संघांचा समावेश आहे.

सिनियर सुपर 8 गटातील गुण : (वरिष्ठ गट)
या गटामध्ये शिवाजी तरूण मंडळ, फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळ, दिलबहार तालीम मंडळ-अ, संयुक्त जुना बुधवार पेठ, खंडोबा तालीम मंडळ-अ, पाटाकडील तालीम मंडळ-अ, बालगोपाल तालीम मंडळ, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब-अ या संघांचा समावेश आहे.
सिनियर 8 गटातील गुण :
-विजयी संघास : 3 गुण
-सामना बरोबरीत राहील्यास : ट्रायब्रेकरवर निकाल लावला जाईल.
-सिनियर सुपर 8 गटातील गुण :
-विजयी संघास : 3 गुण
-सामना बरोबरीत राहील्यास : दोन्ही संघांना 1-1 गुण
-गुण बरोबरीत राहील्यास गोल डिफरन्स पाहिला जाईल
-गोल डिफरन्स बरोबरीत राहिल्यास चिठ्ठ्याद्वारे निकाल लावला जाईल.

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
हंगामात सामना सुरू असताना खेळाडू, समर्थक, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये रंग, पावडर, फटाके, झेंडे, काचेच्या बाटलीतील शीतपेये आणण्यास मनाई आहे. स्पर्धेत मैदानावर व मैदानाबाहेर संघ, खेळाडू, समर्थकांनी हुल्लडबाजी करण्याऱ्यांवर कठोर कारवाई व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. स्पर्धेत पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

Advertisement
Next Article