कोल्हापूरात गणेशमुर्ती विसर्जनाच्या धामधुमीत तरूणाचा खून ! क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून खूनाची घटना
चाकूने भोसकून खून; संशयीत आरोपी स्वत: पोलिसात हजर; जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोल्हापूर प्रतिनिधी
हातगाडी लावण्याच्या कारणातून झालेल्या वादावादीतून चिडून जावून, एका अविवाहित तऊणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. इम्रान इमामुद्दीन मुजावर (वय 32, रा. आराम कॉर्नर, कोल्हापूर) असे मृत तऊणाचे नाव आहे. शहरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमुर्ती विसर्जनाची धामधुम सुऊ असतानाच, शहरातील आराम कॉर्नर परिसरात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खूनाची ही घटना घडली आहे.
या खूनाची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून, खूनाच्या घटनेची माहिती घेतली. खूनाच्या घटनेनंतर संशयीत युसुफ अलमसजीत (दाजी) हा स्वत: बुधवारी पहाटे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर झाल्याने, पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
इम्रान मुजावरचा चाकू हल्ल्यात खून झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांच्यासह मित्रमंडळींनी समजताच त्यांनी त्वरीत सीपीआरमध्ये धाव घेतली. त्यामुळे सीपीआरच्या परिसरात मोठी गर्दी झाल्याने, काही काळ तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
अधिक माहिती अशी की, इम्रान मुजावर यांचा शहरातील आराम कॉर्नर परिसरात कटलरी साहित्याचे दुकान लावून, विक्री करण्याचा लघू व्यवसाय करीत होता. त्यांच्या दुकानालगत संशयीत युसुफ अलमसजीत (दाजी) यांच्या नातेवाईकांचे पर्स विकण्याचे दुकान आहे. सोमवार (16 सप्टेंबर) रोजी हातगाडी लावण्यावरुन इम्रान मुजावर यांचा त्यांच्याच समाजातील एका महिलेशी वाद झाला होता. या वादाचा जाब विचारण्यासाठी संशयीत युसुफ अलमसजीत (दाजी) याने इम्रानला फोन कऊन कुठे आहेस. यांची माहिती घेवून भेटायला येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी इम्रानने त्याला आराम कॉर्नर परिसरात असलेल्या टिव्ही दुकानच्या दारात बसल्याचे सांगितले. त्यावऊन संशयीत युसुफ अलमसजीत (दाजी) या ठिकाणी आला. त्याने इम्रानला मिठ्ठी मारण्याचे नाटक कऊन, त्याला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. जखमी इम्रानला त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा काही वेळात मृत्यु झाला. या घडल्या प्रकाराची माहिती समजताच सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमुर्ती विसर्जन मिरवणूकीच्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व सीपीआरमध्ये धाव घेवून, घडल्या घटनेची माहिती घेतली. या खूनाबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुऊ असतानाच बुधवारी पहाटेच्या सुमारास संशयीत युसुफ अलमसजीत (दाजी) हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाल्याने, पोलिसांनी त्याला अटक केली.