मुद्रांक शुल्कात कोल्हापूर टॉपवर
कोल्हापूर :
राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामध्ये कोल्हापूर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग वसुलीत टॉपवर आहे. चार वर्षामध्ये तब्बल 1 हजार 666 कोटी 77 लाखांचा महसुल मुद्रांक शुल्कमधून मिळाला आहे. 3 लाख 37 हजार 712 दस्त नोंदणीतून हा महसुल जमा झाला आहे.
जीएसटी, मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क, आयकर असे सरकारचे उत्पन्नाचे स्त्राsत आहे. यामध्ये मुद्रांक शुल्कातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांसाठी निधीचा वापर केला जातो. गेल्या नऊ महिन्यांत राज्य सरकारला मुद्रांक शुल्क विभागाने तब्बल 40 हजार 196 कोटी रुपयांचा महसूल गोळा करून दिला आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने गेल्या आर्थिक वर्षात 50 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केला होता. गेल्या वर्षी राज्यभरात 27 लाख 90 हजार 121 दस्तांच्या नोंदणीतून हा महसूल जमा झाला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातून चार वर्षामध्ये तब्बल 1 हजार 666 कोटींचा मुद्रांक शुल्क जमा झाला आहे. विशेष म्हणजे गेले तीन वर्ष टार्गेटपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क जमा झाला आहे. यामध्ये 2021-22 मध्ये 329 कोटी टार्गेट होते. 68 हजार 878 दस्त नोंदणीतून 330 कोटी 26 लाख जमा झाले. 2022-23 या आथिंक वर्षात 350 कोटींचे टार्गेट असताना 86 हजार 795 दस्त नोंदणीतून 456 कोटी 20 लाख इतका मुद्रांक शुल्क जमा झाला आहे. 2023-24 मध्ये 525 कोटींचे टार्गेट असताना 96 हजार 639 दस्त नोंदणीतून 532 कोटी 56 लाख, तर 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 640 कोटींचे टार्गेट असताना डिसेंबर 2024 अखेर 55 हजार 430 दस्त नोंदणीतून 347 कोटी 75 लाखांचा महसुल जमा झाला आहे.