महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोयता नाचवून दहशत माजवणे पडली महागात; पोलीस पती- पत्नी निलंबीत

07:50 PM Oct 21, 2023 IST | Abhijeet Khandekar
Kolhapur police
Advertisement

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी

पत्नीकडे पाहत असल्याचा संशयातून कोयता नाचवून दहशत माजविणाऱ्या पोलीस पती पत्नीस निलंबीत करण्यात आले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी शनिवारी आशुतोष वसंत शिंदे, रेश्मा आशुतोष शिंदे यांच्यावर ही कारवाई केली. पाचगांव (ता. करवीर) येथील शांतीनगर परिसरात गाडगीळ कॉलनीत सोमवारी रात्री हा प्रकार घडला होता. याबाबतची फिर्याद विनोदकुमार गुणवंतराव वावरे (वय 40) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली त्याची पत्नी रेश्मा हे दोघे कुटूंबासह राहतात. हे दोघेही नेहमी किरकोळ कारणावरून कॉलनीतील लोकांशी नेहमी वाद घालत असतात. सोमवारी रा‰ाrही पत्नीकडे पाहत असल्याच्या संशयावरुन कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे याने विनोदकुमार वावरे यांच्याशी वाद घातला. कोयता नाचवत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले फिर्यादी, त्यांची बहीण आणि दाजी यांना शिंदे दाम्पत्याने मारहाण केली. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यदीची दखल घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी शिंदे दाम्पत्यावर निलंबनाची कारवाई केली.

Advertisement

Advertisement
Tags :
kolhapurPolice husband-wifePolice husband-wife suspendedterrorize by Koita
Next Article