महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोलीस कर्तव्य मेळाव्यात कोल्हापूर संघास उपविजेतेपद

02:55 PM Dec 14, 2024 IST | Radhika Patil
Kolhapur team wins runner-up title in police duty meet
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

पुणे येथील राज्य राखीव पोलीस दल क्रमांक दोनच्या परेड मैदानवर झालेल्या 19 व्या राज्य पोलीस कर्तव्य मेळावा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राच्या संघाने उपविजेते पदाची ट्रॉफीसह कॉम्प्युटर अवेअरनेस कॉम्पिटिशन ट्रॉफी, डॉग स्कॉड कॉम्पिटिशन ट्रॉफी, पोलीस फोटोग्राफी कॉम्पिटिशन ट्रॉफी अशा ट्रॉफीज मिळविल्या. या संघाना राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला याच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस उपाअधीक्षक पद्मा कदम उपस्थित होत्या.

Advertisement

या पोलीस कर्तव्य मेळाव्यात तपासातील वैज्ञानिक सहाय, गुन्हे विषयक छायाचित्रण, ध्वनीचित्रीकरण, घातपात विरोधी तपासणी, संगणक जागऊकता अशा विभागात स्पर्धा घेण्यात आली. तसेच गंभीर गुह्याचा छडा लावण्यासाठी वापरण्यात येणारे पोलिसांचे प्रशिक्षित श्वान देखील मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यामध्ये फोर्स वन मुंबई, कोल्हापूर विभाग, एसआरपी, एटीएस, नागपूर शहर आदी कौशल्यापूर्ण कामगिरी केली. या स्पर्धा पुणे येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 1 2 तसेच महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, गुन्हे अन्वेषण विभाग येथे घेण्यात आल्या.

पोलीस कर्तव्य मेळावा हा पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार याच्या तपासाचे कौशल्य वाढीस आणि नवीन कायद्यामध्ये समाविष्ट असलेले सायंटिफीक पध्दतीच्या तपासामधील महत्वाच्या माहितीसाठी उपयुक्त आहेत. या स्पर्धा निकोप व खेळीमेळीच्य वातावरणात पार पडल्या. स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान 67 व्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यामध्ये दोन सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या राज्यातील दहशतवाद विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुरी पवार यांना ज्योत आणण्याचा मान देण्यात आला. तर कोल्हापूर संघप्रमुख पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी स्पर्धकांना शपथ दिली.

या स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्रातील फिंगर प्रिंट रजत पदक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम (सांगली), कॉम्प्युटर अवेअरनेस रजत पदक प्रसाद मांढरे (सोलापूर ग्रामीण), पोलीस फोटोग्राफी रजत पदक रघूनाथ शिंदे (पुणे ग्रामीण फोटोग्राफर), कास्य पदक जयवंत सादुल (सोलापूर ग्रामीण), श्वान पथक स्पर्धेत सुवर्ण पथक सिध्दलिंग स्वामी (श्वान टेरी, सोलापूर ग्रामीण), रजत पदक नीलेश दयाळ (श्वान सूर्या, सातारा), क्राईम ट्रेकिंग सुवर्ण पदक शिवा सौदागरे (श्वान जिमी, सोलापूर ग्रामीण) या खेळाडूनी वैयक्तिक पदक प्राप्त केली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article