Kolhapuri chappal | कोल्हापुरी चप्पल जाणार आता सातासमुद्रापार...!
कोल्हापूरी चप्पलांचा लक्झरी फॅशनमध्ये प्रवेश
कोल्हापूर : भारतीय पारंपरिक धर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक बॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास धर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम धर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन याणिज्य दूतावासात, इटली, भारत व्यापारी परिषदैनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यामुळे आता कोल्हापुरी चप्पल सातासमुद्रापार जाणार आहे,
शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, 'प्राडा'च्या आधुनिक आणि समकालीन डिझाईन शैली यामाध्यमातून चप्पल विकसित केल्या जाणार आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीने कोल्हापुरी कौशल्याला 'प्राडा'ची आधुनिक साथ मिळणारआहे. कोल्हापुरी चप्पला पुढील वर्षी फेब्रुवारीपासून 'प्राडा'च्या ४० विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
यासाठी महाराष्ट्र शासनाचे ठोस पाठबळ लाभले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. हा करार प्रधान सचिव तथा लिडकॉमचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांच्या नियोजनामुळे झाला आहे. धोरणात्मक भारतीय कारागिरांच्या अतुलनीय कलेला आधुनिक जगात योग्य स्थान देण्यासाठी प्राडा वचनबद्ध आहे. चप्पल कलेक्शनच्या माध्यमातून भारतीय कारागिरीचा आडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स" प्रकत्याचा आराखडा, अंमलबजावणी आणि त्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे या करारात नमूद केली आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पारंपरिक कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कुशल कारागिरांच्या सहाय्याने या चपला भारतात बनवल्या जातील,
चपला बनवण्याच्या पारंपरिक पद्धती आणि 'प्राडा "च्या समकालीन डिझाईन्स तसेच प्रीमिअम दर्जाच्या मटेरियलच्या सहाय्याने या कलेक्शनच्या माध्यमातून भारतातील संपन्न वारसा आणि आधुनिक लक्झरी फॅशनची अभिव्यक्ती यात एका नव्या संवादाला सुरुवात केली जाणार आहे. पारंपरिक कोल्हापुरी चपला महाराष्ट्रातील चार जिल्हे (कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर) आणि कर्नाटकातील चार जिल्हे (बेळगावी, बागलकोट, धारवाड, बिजापूर) या आठ जिल्ह्यांमध्ये बनवल्या जातात. -. २०१९ मध्ये कोल्हापुरी चपलांना जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) ८, टॅग देण्यात आल्याने त्यांची अस्सलता जपली गेली आणि त्यांचे , सांस्कृतिक महत्व अधोरेखित झाले.
-