कोल्हापूर हादरले : आईवरून शिवी दिल्याच्या रागातून मित्राचा गळा आवळून खून
हॉकी स्टेडियम परिसरात तरुणाचा निघृण खून
कोल्हापूर : जेवणानंतर झालेल्या वादातून आईवरुन शिवी दिल्याचा राग मनात धरुन मित्रानेच मित्राचा गळा आवळून निघृण खून केला. हॉकी स्टेडियम परिसरात दुचाकीतील पेट्रोल संपल्याचा बहाणा करुन शांत डोक्याने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या सहा तासात मनिष जालिंदर राऊत (वय २८ रा. कळंबा रिंगरोड, राऊत कॉलनी) याला अटक केली. सिद्धू शंकर बनवी (वय २० सध्या रा. वाशीनाका, कळंबा रिंगरोड, मुळ रा. शिकनंदी ता. गोकाक, जि. बेळगांव) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम परिसरातील एका लाईटच्या खांबाला तरुणास बांधल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता तरुण मृत झाल्याचे दिसून आले. त्याला लाईटच्या वायरने खांबाला बांधण्यात आले आले होते. तसेच त्या तरुणाच्या तोंडातून रक्त येत होते. हा खून असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जुना राजवाडा, स्थानिक गुन्हे अन्वेषणसह चारही पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांना घटनास्थळी पाचारण केले.
मृत तरुणाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मृताच्या खिशामध्ये ओळखीचा कोणताही पुरावा नव्हता. मृताच्या खिशात केवळ दोन दोन गुटख्याच्या पुड्या मिळाल्या. पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क वापरुन मृताची ओळख पटविली. सकाळी १० च्या सुमारास मृत तरुण सिद्धू बनवी असल्याचे समोर आले.
मयत सिद्धूचा मोठा भाऊ शिवानंद याचा ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरमध्ये वाळू, खडी, विटा भरण्याचे काम सिद्धू व मनिष करतात. हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. रविवारी सुट्टी असल्यामुळे रात्री ११ च्या सुमारास हे दोघे दारु पिण्यासाठी बसले होते. रात्री २ वाजेपर्यंत दारु पिऊन झाल्यानंतर व्हिनस कॉर्नर येथील एका हॉटेलमध्ये ते जेवणासाठी गेले होते. जेवताना या दोघांमध्ये वाद झाला, यातूनच सिद्धूने मनिषला आईवरुन शिवीगाळ केली.
जेवण आटोपून दोघेही दुचाकीवरुन घरी निघाले. यावेळी विश्वपंढरीच्या समोरच्या बाजूला हे दोघे लघुशंकेसाठी थांबले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी रस्त्याकडेला खांबाला टेकून बसलेल्या सिद्धूचा तेथीलच वायरने मनिषने गळा आवळला.