For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

शहापुरातील माजी सरपंचांच्या घरात भरदिवसा चोरी : १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

07:11 PM Nov 18, 2023 IST | Abhijeet Khandekar
शहापुरातील माजी सरपंचांच्या घरात भरदिवसा चोरी   १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली - बोरपाडळे राज्य मार्गावरील शहापूर ता.पन्हाळा येथील माजी सरपंच डॉ.कृष्णात आनंदराव पाटील यांच्या घरी सकाळी ११ ते १२ वा. चे सुमारास भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून घरातील तिजोरीचा दरवाजा उचकटून सुमारे १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला.

Advertisement

याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात डॉ. कृष्णात पाटील यानी अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद नोंदवली आहे. गत तीन महिन्यात शहापूर येथील रस्त्याकडेची दुकान, घरे चोरट्यानी टार्गेट केली असून ही चौथी चोरी माजी सरपंचांच्या घरी भरदिवसा झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलीसांतून प्राप्त माहिती अशी की कोडोली ते बोरपाडळे मार्गावरील शहापूर येथील डॉ. पाटील यांचे रस्त्यालगत घर आहे. आज सकाळी त्यांच्या घरातील सर्वजण बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप लावले होते ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप फोडून घरात प्रवेश केला आणि घरातील दागिने लंपास केले.डॉ. पाटील यांचा मुलगा तन्मय हा खाजगी शिकवणीला गेला होता तो दुपारी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यामध्ये तीन मंगळसूत्र, सोन्याचे नाणे, टॉप्स, चैन, अंगठी, मोहनमाळ आणि नुकताच दिवाळी सणानिमित्त केलेला सोन्याचा नेकलेस असा ११९ ग्रॅम च्या म्हणजेच सुमारे १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात मारला असून कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.