महाबळेश्वर आंबेनळी घाटात सातशे फूट खोल दरीत टेम्पो कोसळला दोन जण गंभीर जखम
कुडाळ प्रतिनिधी
मेटतळे या गावाजवळ चार चाकी टेम्पो600 ते 700 फूट खोल दरीत कोसळली असून हा अपघात दुपारी एकच्या सुमारास घडला असून यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे महाबळेश्वर वरून पोलादपूरच्या दिशेने आंबेनळी घाटातून मेट तळे या ठिकाणी चालकाचा ताबा सुटून थेट टेम्पो दरीत कोसळला यामध्ये चालक आणि त्याचबरोबर एक क्लीनर असे दोन व्यक्ती या टेम्पो मधून प्रवास करत होते घटनास्थळा अपघात घडल्यानंतर तात्काळ महाबळेश्वर ट्रेकर्स आणि शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सचे जवान घटनास्थळावर दाखल झाले तात्काळ 600 ते 700 फूट खोल दरीत ट्रॅकरच्या जवानांनी जखमी व्यक्तींना वर काढण्यासाठी मोहीम सुरू केली यामध्ये महाबळेश्वर ट्रॅकर चे दोन जवान देखील जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलेले आहे चालकाचे पूर्णता हात पाय मोडले आहेत व चालक गंभीर रित्या जखमी झालेल्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची महाबळेश्वर ट्रॅकरच्या जवानांनी प्राथमिक माहिती समोर सांगितली आहे घटनास्थळावर महाबळेश्वर पोलीस देखील दाखल झालेले असून युद्ध पातळीवर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात येण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे 600 ते 700 फूट खोल दरीत हा अपघात झाल्याने जखमींना वर काढण्यासाठी विलंब लागत आहे
महाबळेश्वर ट्रेकरचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले असून बचाव मोहीम सुरू आहे