Kolhapur : आचारसंहितेत कोल्हापूर पोलिसांची पायी गस्त; संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त
एसपी योगेश कुमार यांच्या आदेशानुसार पोलिसांचा कडक पहारा
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या नगरपालिका निवडणूकांची आचारसंहिता सुरु आहे. या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शहरात सोमवारपासून पायी गस्त घालणे सुरू केले. शहरातील चारही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी संवेदनशिल भागात गस्त घातली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शहरात सध्या चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरीसह घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनापोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी प्रभारी अधिका-यांना दिल्या होत्या. त्यानुसार शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी सायंकाळपासून शहरात ठिकठिकाणी पायी गरत घालणे सुरू केले.
प्रभारीअधिकाऱ्यांनी स्वतः यात सहभाग घेतला. निवडणुकांचे वातावरण तापत असल्याने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, कोम्बिंग ऑपरेशन राबवणे, संशयितांचा शोध घेणे,सायकल गस्त प्रमाणेच अवस्था होणार काय
पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पायी गरत ही संकल्पना चांगली आहे. मात्र पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. नाहीतर केवळ फोटोसेशनसाठीच या पायी गरतचा वापर होईल, काडी वर्षापूर्वी शहरात सायकल वरुन पोलिसांनी गस्त सुरु केली होती. मात्र काही दिवसांतच या सायकली पोलीस स्टेशनमध्ये अडगळीच्या ठिकाणी धुळखात पहल्या होत्या. नाकाबंदी अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रभारी अधिका-यांनी दिली.