For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वारसा हक्क कराच्या आडून काँग्रेसकडून लांगुलचालन ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातून जोरदार टीका

11:09 PM Apr 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
वारसा हक्क कराच्या आडून काँग्रेसकडून लांगुलचालन   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातून जोरदार टीका
Advertisement

कोल्हापुरात झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस बरोबरच इंडिया आघाडीवर टीकेची झोड उठवली. इंडिया आघाडीला टीका करताना 'इंडी अलायन्स' असे संबोधून त्यांनी प्रभू श्रीरामचे आमंत्रण नाकारले, त्यांना जनता निवडून देणार नाही. वारसा हक्क कराच्या आडून काँग्रेसला विशिष्ट समुदायाचे लांगुलचालन करायचे असून त्यांना काँग्रेसला 370 परत आणायचे आहे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Advertisement

कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा झाली या जाहीर सभेला संबोधन करताना त्यांनी महायुतीच्या कोल्हापुरातील दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन . 

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि त्या अनुषंगाने इंडिया आघाडीवर ही जोरदार निशाणा साधला इंडिया आघाडीने प्रभू रामचंद्राचे मंदिराचे उद्घाटनाचे निमंत्रण नाकारून श्री रामाचा अवमान केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर काँग्रेसला सत्तेवर येऊन 370 कलम मागे घ्यायचं आहे असेही ते म्हणाले.

Advertisement

वारसा हक्क करावरून चाललेल्या वादाच्या मुद्द्याला हात घालताना त्यांनी काँग्रेस अशा प्रकारचा कर आणून गोरगरिबांचे संपत्ती लुटण्याचा लुटणार असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसला देशांमध्ये दुष्टीकरणाचे राज्य राजकारण चालवायचे आहे असेही ते म्हणाले.

राहुल गांधींवर निषाणा साधताना नरेंद्र मोदी यांनी त्यांना काँग्रेसचे युवराज असे म्हटले. राहुल गांधी तुमच्या संपत्तीची, महिलांचे दागिने यांची चौकशी करणार आहेत. या देशावर पहिला हक्क ज्यांचा आहे अस सांगितलं जातं.अशा लोकांना तुमची संपत्ती वाटतील. काँग्रेसने हे लांगुलचालन चालवले असून ते यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसच्या युवराजांनी आणलेल्या या फॉर्म्युल्यातून सरळ सरळ लूट करणार आहे. असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Advertisement
Tags :

.