खासदार असताना संभाजीराजे छत्रपतींनी काय केलं ? विशाळगड प्रकरणावर संभाजीराजे राजकारण करत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप
विशाळगड अतिक्रमण प्रकरणामध्ये संभाजीराजे छत्रपती हे राजकारण करत आहेत असा आरोप करत त्यांनी राज्यसभेचे खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना काय केले ? असा सवाल सकल हिंदु समाजाचे अध्यक्ष कुंदन पाटील यांनी केला आहे. तसेच पन्हाळगडावरील अतिक्रमण प्रशासनाने लवकरात लवकर नाही काढली तर सकल हिंदु समाज वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे तसेच पन्हाळ गडावर फार्महाऊस बांधतील असा इशाराही त्यांनी दिला.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=aO59748pcWA[/embedyt]
विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत असताना स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपुर्वी पत्रकारपरिषद घेऊन प्रशासनाला इशारा दिला. त्यांनी शिवभक्तांना 'चलो विशाळगड'ची हाक देऊन विशाळगडावरील अतिक्रमण त्वरीत काढावित अन्यथा आम्हाला पावले उचलावी लागतील असा गर्भित इशारा त्यांनी दिला होता.
या प्रकरणामध्ये आता विश्व हिंदु परिषदेने उडी घेतली असून विशाळगड अतिक्रमण प्रकरणामध्ये संभाजीराजे छत्रपती राजकारण करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. आज कोल्हापूरामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी आपली भुमिका मांडली.
ते म्हणाले, "विशाळगड अतिक्रमण प्रकरण हे न्यायप्रविशष्ठ असताना संभाजीराजे छत्रपती यांची भुमिका अनाकलनिय आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी केवळ विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात भुमिका न घेता त्यांनी राज्यातील इतर गडावरही लक्ष घालावे यासाठी हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या पाठीशी राहील." असेही त्यांनी म्हटले आहे.
संभाजीराजेंनी खासदार असताना काय केलं ?
संभाजीराजेंच्या विशाळगड भुमिकेवर प्रश्न उपस्थित करताना जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी जोरदार आरोप केले. संभाजीराजे हे विशाळगड अतिक्रमण प्रकरणामध्ये राजकारण करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच संभाजीराजे छत्रपती हे स्वता राज्यसभेचे खासदार असताना आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना त्यांनी याबाबत काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
...अन्यथा पन्हाळगडावर फार्महाऊस साठी रेखांकन
प्रशासनाला इशारा देताना, विशाळगडावरील अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वाढले असून ते काढण्यासाठी येणारा खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करावा. अन्यथा वक्फ बोर्डाच्या जागेवर मंदिरे बांधण्यात येऊन हिंदुत्ववादी संघटनांची कार्यकर्ते पन्हाळगडावर जाऊन फार्महाऊन बांधण्यासाठी जागांचे रेखांकन करताील. असा इशाराही त्यांनी दिला.