For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेंट्रिंगला जातो असे सांगून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

04:51 PM Jul 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
सेंट्रिंगला जातो असे सांगून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
Kolhapur News Shirgoan
Advertisement

शाहूवाडी प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील  गणेश अर्जुन सातपुते हा तरुण चार दिवस बेपत्ता होता. त्यांचा मृतदेह कडवी नदीपात्रात सापडला. या घटनेची  नोंद शाहूवाडी पोलीसात झाली आहे.

Advertisement

मिळालेल्या माहिती नुसार, शिरगाव येथील तरुण गणेश सातपुते हे मंगळवार दि ९ रोजी घरी सेंट्रींग कामाला जातो असे सांगून गेले होते. रात्री उशिरा गणेश घरी का आले नाही म्हणून त्याच्या मित्र व नातेवाईकाकडे चौकशी केली काहीही महिती मिळून आली नाही.त्याची पत्नी माधूरी सातपुते यांनी शाहूवाडी पोलीसात पती बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. शुक्रवार दि १२ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता गणेश सातपुते याचा मृतदेह कडवी नदी काठी ग्रामस्थांना आढळून आला. या घटनेची महिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. वेधकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पाश्चात पत्नी मुलगा, वडील असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.