For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू! कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून निर्णय

06:17 PM Jul 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू  कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून निर्णय
Kolhapur News Prohibition order applied
Advertisement

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात किल्ले विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणविरोधात हिंदूत्ववादी संघटनाकडून आंदोलन करण्यात येत आहे. तसेच विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. मोहरम सण व आषाढीवारी, नंदवाळ यात्रा, सण इत्यादी साजरे होणार आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 6 ते दिनांक 29 जुलै रोजी रात्री 24 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये बंदी आदेश जारी करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.

Advertisement

हा आदेश ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणे संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.